Goa Dairy  Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy: दुधाचे दर वाढणार? 'गोवा डेअरी'च्या आमसभेत सूतोवाच

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Dairy Milk Price Hike News

फोंडा: गोवा डेअरी सध्या नफ्यात आहे. मात्र, कामगारांना वेतनवाढ देताना दूध उत्पादकांची प्रतिलिटर तीन रुपये दरवाढीची मागणीही विचारात घ्यावी लागेल. त्यासाठी कदाचित पुढील काळात दुधाच्या पाकिटावर दरवाढ करावी लागेल, असे सूतोवाच गोवा डेअरीच्या आमसभेत करण्यात आले.

कुर्टी-फोंडा येथील सहकार भवनात ही आमसभा झाली. या आमसभेला प्रशासकीय समितीचे अध्यक्ष पराग नगर्सेकर, समिती सदस्य रामा परब, संदीप पार्सेकर तसेच सहकार खात्याचे निबंधक सतीश सावंत आदी उपस्थित होते.

डेअरीच्या कामगारांनी मागण्या मान्य न झाल्यास संपाचा इशारा दिला आहे. मात्र, त्याची नोटीस डेअरीला आलेली नाही. नोटीस आल्यानंतर विचार करू; परंतु वेतनवाढ आणि दूध उत्पादकांना दरवाढ यांची सांगड घालताना मोठी कसरत करावी लागणार असल्याचे व्यवस्थापकीय समितीने स्पष्ट केले.

पशुखाद्य प्रकल्प; हालचाली थंडावल्या

डेअरीचा पशुखाद्य प्रकल्प पशुसंवर्धन खात्याने घ्यावा असे मागच्या आमसभेत सुचविले होते. तसा प्रस्ताव खात्याकडे पाठविला होता; पण पशुसंवर्धन खात्याने त्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती देण्यात आली.

डेअरीचा कर्मचारी एलआयसी एजंट!

डेअरीचा एक कर्मचारी एलआयसी एजंट म्हणून काम करीत असून डेअरीच्या कामाऐवजी एजंटगिरीवर जास्त भर देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्याचे कामावर लक्ष नसल्याचेही सांगण्यात आले. संबंधित व्यक्ती सोसायटीच्या निवडणुकीतही हस्तक्षेप करीत असल्याचा मुद्दा यावेळी चर्चेला आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: खराब हवामानाचा फटका; दाबोळीवर उतरणारी पाच विमाने इतरत्र वळवली

नाटो सदस्य इटलीचा भारतीय नौदलासोबत ऐतिहासिक सराव, गोव्याच्या समुद्रात सहा दिवस रंगला थरार

गोव्यात पुन्हा दाणादाण! जोराचे वारे आणि विजांचा कडकडाट; काही ठिकाणी 24 तास बत्ती गुल

Saint Francis Xavier: सेंट फ्रान्सिस झेवियरचा केला होता ‘भारतातील महान पुरुष’ असा गौरव! पहिले टपाल तिकीट कधी?

Margao News: कंत्राटदार मिळेना, खर्चावरून गोंधळ, बागेत कॉफी शॉप; मडगाव पालिकेची सभा ठरली वादळी

SCROLL FOR NEXT