Goa dairy Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy Milk Price : गोवा डेअरीच्या दूध दरात मोठी वाढ; मोजावे लागणार 'इतके' रुपये

गेल्या आठ महिन्यांत गोवा डेअरीची दुसऱ्यांदा दरवाढ

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Dairy : महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. गोवा डेअरीच्या दूध दरात प्रती लिटर 4 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे तसेच पशु खाद्यही प्रती किलो 4 रुपयांनी महागणार आहे. ही दरवाढ उद्यापासून म्हणजेच शुक्रवारपासून लागू होणार आहे.

गेल्या आठ महिन्यांत गोवा डेअरीने ही दुसऱ्यांदा दरवाढ केली आहे. दूध दरात प्रती लिटर 4 रुपयांनी वाढ तर पशु खाद्य प्रती किलो 4 रुपयांनी महागणार आहे. दूध दरात वाढ केलेल्या 4 रुपयांपैकी 2 रुपये दूध उत्पादकांना आणि 2 रुपये गोवा डेअरीला मिळणार आहेत.

गोवा डेअरीचे स्टँडर्डाईज्ड दूध अर्ध्या लिटर पाकिटाला 27 रुपये द्यावे लागायचे ते आता 29 रुपये द्यावे लागणार आहे तर हायफॅट एक लिटरच्या दुधाला कालपर्यंत 62 रुपये द्यावे लागायचे ते आता 67 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे साधारण चार ते पाच रुपये विविध तऱ्हेच्या दुधावर प्रती लिटर दरवाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baina Beach: बायणा किनारा 30 वर्षांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव रद्द; स्थानिकांच्या विरोधाला यश

भारतासाठी टेन्शन फ्री बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवरील कडक निर्बंध हटवले; 100 टक्के टॅरिफचा धोका टळला

Smart Meter Scheme: स्मार्ट वीज मीटरवर मानवाधिकार आयोगाचा हिरवा कंदील; तरी गोव्यात योजना तूर्तास स्थगितच

Horoscope: नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची कृपा! मेष ते मीन, 12 राशींचे आजचे राशिभविष्य; कोणाला मिळणार धनलाभ?

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

SCROLL FOR NEXT