Goa Milk Import Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy: गोवा डेअरीचे हायफॅट दूध महागले! नाताळ तोंडावर असताना दरवाढ; गोपनियतेमुळे उलटसुलट चर्चा

Goa Dairy High Fat Milk Price: ऐन नाताळ सणाच्या उत्सवाच्या कार्यकाळात गोवा डेअरीने आपल्या ‘हायफॅट’ दुधात प्रती लिटर तीन रुपयांनी वाढ केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: ऐन नाताळ सणाच्या उत्सवाच्या कार्यकाळात गोवा डेअरीने आपल्या ‘हायफॅट’ दुधात प्रती लिटर तीन रुपयांनी वाढ केली आहे. गेल्या ३ तारखेपासून झालेल्या या वाढीबद्दल गोपनियता बाळगण्यात आली होती. त्यामुळे कोणत्या ‘सल्लागारा‘ने हा दूध दरवाढीचा सल्ला दिला, त्याबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

गोवा डेअरीच्या हायफॅट दूध दरात ही वाढ करण्यात आली असून आता अर्धा लिटरमध्येही हे दूध उपलब्ध करण्यात आले आहे. त्याची किंमत ३५ रुपये ठेवण्यात आली आहे. या दुधाची किंमत आधी प्रती लिटर ६७ रुपये होती ती आता ७० झाली आहे.

मात्र दूध उत्पादक तसेच ग्राहकांना याबाबत कोणतीही कल्पना नाही. गोवा डेअरीने इतर प्रकारच्या दूध पाकिटांवर मात्र दरवाढ केलेली नाही, तरीपण ही दरवाढही गुपचूपरीत्या केली जाणार आहे काय, असा सवाल ग्राहक करीत आहेत.

दरम्यान, दूध दरवाढीबाबत आम्हाला कोणतीही सूचना नाही. गोवा डेअरीने नव्याने चालू केलेल्या अर्ध्या लीटरीची पिशवी ग्राहकांसाठी सुरु केली आहे. मात्र, त्याला विशेष मागणी नाही. ३५ रुपये त्याची किंमत आहे, असे पणजीतील एका दुधविक्रेत्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Russian Tourist Murder: 'त्या' रशियन महिलांचा खून पैशासाठीच, राग आल्यावर 'आलेक्सेई' महिलांना टार्गेट करायचा; तपासात धक्कादायक माहिती समोर

Robbery Attempt: होंडा येथील नवनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा पारा चढला? ध्रुव जुरेलच्या कानाखाली मारायला गेला, नक्की काय घडलं? Watch Video

Sattari Fire: सत्तरीत आगीचे तांडव! भीषण आगीत घर भस्मसात, 15 लाखांचं नुकसान; आगीचं कारण अस्पष्ट Watch Video

Russian Tourist Murder: 2 रशियनांच्या हत्येनंतर प्रशासन 'ॲक्शन मोड'मध्ये; पर्यटक व्हिसावर क्लब-पबमध्ये काम करणाऱ्यांची होणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT