Goa Dairy News Updates,  Dainik Gomantak
गोवा

गोवा डेअरीला हवाय नवीन ‘एमडी’

सर्वेक्षणानंतरच दूध दरात वाढ शक्य; महिन्याकाठी 22 लाख रुपयांचे नुकसान

दैनिक गोमन्तक

फोंडा: राज्यातील एकमेव असलेल्या दूध उत्पादकांच्या गोवा डेअरीसाठी सध्या व्यवस्थापकीय संचालकाचा शोध सुरू झाला आहे. गोवा डेअरी व्यवस्थापनाने नवीन ‘एमडी’साठी शोध सुरू करताना त्यासाठी जाहिरातबाजीही केली आहे. विशेष म्हणजे गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक एन. सी. सावंत यांच्या निवृत्तीनंतर या पदावर एकहीजण टिकलेला नाही आणि सध्या कार्यरत एमडी पदावर तर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे नवीन व्यवस्थापकीय संचालकाची निकड निर्माण झाली आहे. (Goa Dairy News updates)

गोवा डेअरीचे उत्पादन सध्या 55 हजारांच्या आसपास आहे. वाढता डोलारा आणि खर्च यामुळे सद्यस्थितीत गोवा डेअरीला महिन्याकाठी 22 लाख रुपयांची नुकसानी होत आहे. गोवा डेअरीतील नोकरांचा खोगिरभरतीचा विषयही मागच्यावेळेला तापला होता.

निवडून आलेल्या गोवा डेअरीच्या संचालक मंडळाचा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळेच सरकारनियुक्त प्रशासकीय समितीकडे गेल्या 6 सप्टेंबर 2018 पासून आहे. सध्या साडेतीन वर्षे सरली तरी आणि मध्यंतरीचा केवळ चार महिन्यांचा कार्यकाळ सोडला, तर निर्वाचित मंडळाकडे ताबा आलेला नाही, सरकारनियुक्त प्रशासकाद्वारेच गोवा डेअरीचा कार्यभार सांभाळला गेला आहे.

मध्यंतरीच्या काळात दुर्गेश शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली गोवा डेअरीवर प्रशासकीय समिती नियुक्त करण्यात आली. दुर्गेश शिरोडकर यांनी काही धोरणात्मक निर्णय घेतले, तरीपण सरकारची खप्पामर्जी झाल्याने दुर्गेश शिरोडकर यांना हटवले गेले. सध्या प्रशासकीय समितीच्या अध्यक्षपदी पशुसंवर्धन खात्याचे संचालक आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे ती नवनिर्वाचित संचालक मंडळाची.

दरम्यान, गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या अमुलने लिटरमागे दुधाची किंमत गेल्या 1 मार्चपासून वाढवल्याने गोवा डेअरीही दूध दरवाढीच्या तयारीला लागली आहे. महिन्यासाठी बावीस लाखाचे नुकसान होत असल्याने दूध दरवाढ अनिवार्य ठरली आहे. त्यासाठी गोवा डेअरीच्या मार्केटिंगचे सर्वेक्षण सुरू केल्याची माहिती प्रशासकीय समितीच्या सदस्यांनी दिली.

ग्राहकांचा गोवा डेअरी दुधावर विश्‍वास

गोमंतकीय ग्राहकांचा गोवा डेअरीच्या दुधावर पूर्ण विश्‍वास आहे, त्यामुळेच राज्याला गोवा डेअरीच्या दुधाचा तुटवडा भासतो. गोवा डेअरीच्या दुधाची विक्री पन्नास ते सत्तर हजारच्या आसपास बराच काळ राहिली आहे. वास्तविक उत्पादन लाखाच्या आसपास पोचायला हवे, पण तसे होताना दिसत नाही. त्यामागची कारणे शोधून नव्याने धोरणे राबवण्याची खरी गरज आहे. गोवा डेअरीनंतर राज्यात आलेल्या बाहेरील दुधाच्या डेअऱ्यांनी आपला तळ व्यवस्थित ठोकला असताना गोवा डेअरी मात्र कायम वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT