Goa Dairy Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy Corruption News: गोवा डेअरी भ्रष्टाचार प्रकरण; 14 अपात्र संचालकांच्या प्राथमिक सदस्यत्वावरही गंडांतर

प्राथमिक सदस्यपदावरून हटविण्याचे सहकार खात्याचे सोसायट्यांना आदेश

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Dairy Corruption News: गोवा डेअरीतील भ्रष्टाचार प्रकरणी 14 संचालकांना सहकार निबंधकांनी एप्रिल 2023 मध्ये अपात्र ठरवले होते. आता या 14 ही संचालकांना ते ज्या मूळ सहकारी संस्थेचे प्राथमिक सदस्य आहेत, त्यावरूनही हटविण्याचे आदेश संबंधित सोसायट्यांना देण्यात आले आहेत.

ज्या संस्था असे करणार नाहीत, त्या संस्थांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. स्थानिक माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. सहकार खात्याचे उपनिबंधक सीताराम गुरूदास सावळ यांनी ही कारवाई केली आहे.

सहकारी संस्थांतील प्राथमिक सदस्यपदावरच गंडांतर आल्यावर या संचालकांची सहकार कारकिर्द संपुष्टात येणार आहे. दरम्यान, अपात्र संचालकांच्या अपिलावर मुंबई उच्च न्यायालयात याच आठवड्यात सुनावणी होणार आहे.

प्राथमिक सदस्यत्व गोठविण्यात आलेल्या संचालकांमध्ये राजेश कृष्णा फळदेसाई, विठोबा दत्ता देसाई, गुरूदास केशव परब, आत्माराम माधव सहकारी, धनंजय नंदा देसाई, माधवराव शिवाजीराव देसाई, बाबुराव श्रीकांत देसाई, विजयकांत विठोबा गावकर, रूद्रेश्वर शिवानंद पेडणेकर, राजेंद्र वाय. सावळ, उल्हास सिनारी, अजय लक्ष्मीकांत देसाई, बाबू नरहरी कोमरपंत, आलेक्सो फुर्तादो यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT