Goa Dairy Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy: माजी अधिकाऱ्याविरुद्ध लाचप्रकरणी आरोप निश्‍चितीचा आदेश

दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने (एसीबी) दोन वर्षांपूर्वी पणजीतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Dairy: गोवा राज्य सहकारी दूध उत्पादक संघटनेचे (गोवा डेअरी) माजी साहाय्यक व्यवस्थापक विनायक धारवाडकर यांच्या विरोधात लाचप्रकरणी आरोप निश्‍चित करण्याचा आदेश फोंडा न्यायालयाने दिला आहे.

संघटनेचे अधिकारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या अधिकार क्षेत्रात येत आहेत असे निरीक्षण न्यायालयाने हा आदेश देताना नोंदवले आहे. दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने (एसीबी) दोन वर्षांपूर्वी पणजीतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

मुंबई येथील इंस्टॉलेशन सर्विसेस या इलेक्ट्रिकल कंत्राटदाराला गोवा डेअरीला ट्रान्स्फॉर्मर्स, प्रोजेक्शन गियर, एलटी पॅनल एमसीसी आणि पुश बटन स्टेशनचा पुरवठा करण्याचे ५२ लाख ७८ हजार ९३६ रुपये किमतीचे कंत्राट मिळाले होते. कंत्राटदाराला कामाची ऑर्डर देण्यासाठी संशयित विनायक धारवाडकर याने तक्रारदाराकडे प्रथम पाच लाख रुपये लाच मागितली होती.

याला आक्षेप घेतल्यानंतर संशयिताने वाटाघाटी केल्यानंतर ही रक्कम कमी करून ५० हजार ठरविण्यात आली. त्यानुसार २० हजार रुपये अगोदर देण्याचा व ऑर्डर मिळाल्यावर उर्वरित रक्कम देण्याचा कंत्राटदाराचे गोव्यातील प्रतिनिधी अमेय पालेकर यांच्यासोबत सौदा झाला होता. मात्र, सर्वच रक्कम एकाचवेळी देण्याचा बदल करण्यात आला. याप्रकरणी पालेकर

यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तसेच संशयितासोबत झालेल्या संभाषणाचे पुरावे तक्रारीसोबत दिले होते. एसीबीने संशयिताला जाळ्यात अडकवण्यासाठी तक्रारदाराच्या मदतीने सापळा रचला व त्यात संशयित अडकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

SCROLL FOR NEXT