37th National Games: अंतिम क्षणी बाजी पलटली! मात्र नेटबॉलमधील पराभवातही गोव्याची चुणूक

जम्मू-काश्मीर अंतिम क्षणी दोन गुणांनी विजयी, महिलांत तेलंगणा सरस
37th National Games
37th National GamesDainik Gomantak

37th National Games: गोव्याचे पुरुष नेटबॉल खेळाडू अनुभवात किंचित सरस असते, तर त्यांनी ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मोहिमेची सुरवात त्यांनी निश्चितच विजयाने केली असती.

रविवारी सकाळी कांपाल येथील इनडोअर स्टेडियममध्ये ‘अ’ गटातील लढतीत यजमानांनी जम्मू-काश्मीरला चांगलेच झुंजविले, पण 50-52 निसटती हार पत्करावी लागली.

मध्यंतराला गोव्याने जम्मू-काश्मीरला 39-39 असे बरोबरीत रोखले होते. त्यानंतर 35-33 अशी आघाडी प्राप्त केल्यामुळे गोव्याच्या पाठिराख्यांच्या उत्साहाला उधाण आले. चौथ्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघ 39-39 असे बरोबरीत होते.

मात्र अंतिम क्षणी त्यांना अनुभवाचा फटका बसला आणि जम्मू-काश्मीरची सरशी झाली. अखेरच्या क्वॉर्टरमध्ये जम्मू-काश्मीरने १३ गुण नोंदवून मुसंडी मारली, त्यापैकी १० गुण त्यांचा हुकमी गोल शूटर आरिफ खान याने नोंदविले.

मात्र गोव्याच्या आकाश गायकवाड व सन्मय बांदेकर यांचे प्रयत्न सफल ठरले नाहीत. पुढील लढतीत आता गोव्यासमोर महाराष्‍ट्र, हरियाना या मातब्बर संघांचे आव्हान असेल.

गोव्याचे प्रशिक्षक संदीप शेटकर यांनी खेळाडूंच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला. अखेरच्या क्वॉर्टरमध्ये काही चुका झाल्या. त्याचा परिणामी निकालावर झाला, असे शेटकर म्हणाले.

संध्याकाळच्या सत्रात महिलांच्या ‘अ’ गटात तेलंगणाने गोव्यावर ५२-४६ अशी सहा गुणांनी मात केली. सोमवारी महिला संघ अनुक्रमे हिमाचल व हरियानाविरुद्ध खेळेल.

नेटबॉल स्पर्धेचे उद्‍घाटन रविवारी सकाळी क्रीडामंत्री गोविंद गावडे, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळीकर, राष्ट्रीय नेटबॉल विकास समितीचे अध्यक्ष हरी ओम कौशिक, भारतीय नेटबॉल महासंघाचे सचिव विजेंद्र सिंग, स्पर्धा संचालक ललित जिवानी, गोवा नेटबॉल संघटनेचे अध्यक्ष शुभम नार्वेकर, सचिव प्रतीश नाईक यांच्या उपस्थितीत झाले.

37th National Games
Onion Market Price In Goa: कांद्याची 'पन्नाशी' पार; मात्र अभ्यासक म्हणातात की सध्याचे दर...

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com