Annual General Meeting Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy: आर्थिक फटका! नुकसानी साडेसात कोटींची तर 'टीडीएस' प्रकरणी डेअरीला भरावा लागणार 'एवढ्या' लाखांचा दंड

अध्यक्ष पराग नगर्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली

Ganeshprasad Gogate

Goa Dairy गोवा डेअरीच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष पराग नगर्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी सभेत टीडीएस भरणा उशीराने झाल्याने डेअरीला संबंधित खात्याने दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

तो दंड संबंधित कर्मचाऱ्यांकडून वसूल करावा असा निर्णय घेण्यात आला. तर डेअरीच्या नुकसानीच्या संदर्भात आढावा घेण्यात आला. उसगावातील पशुखाद्य प्रकल्पामुळेच दूध महासंघाला तोटा होत असून सद्यस्थितीत महासंघाला 7 कोटी 68 लाखांचा तोटा सहन करावा लागला.

दूध प्रकल्पातील निधी पशुखाद्य प्रकल्पाला द्यावा लागत असल्यानेच हा तोटा होत असल्याचे स्पष्ट झालेय. त्यामुळे सद्यस्थितीत बंद असलेला पशुखाद्य प्रकल्प चालवण्यासाठी सरकारकडे देण्यात येणार असल्याचे सभेत ठरवण्यात आले.

तसेच डेअरीकडून दूध उत्पादकांना गुरांसाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध करून दोन पशुवैद्यकांची नियुक्ती करावी अशी मागणी आमसभेत केली गेली.

त्यालाही सभेत मान्यता मिळाली असून उत्तर व दक्षिण गोव्यात दोन पशुवैद्यक उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना दुधावरील आधारभूत किंमत वेळच्यावेळी देण्यासंबंधीही निर्णय घेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tulsi Vivah: सात म्हार्गाची माती हाडा, तियेची होटी भरा! गोव्यातील तुलसीविवाह ‘व्हडली दिवाळी’

50 Years Of Emergency: भारतीय आणीबाणीची 50 वर्षे

2000 Note: 2000 च्या नोटांबाबत RBI कडून मोठी अपडेट, अजूनही 5817 कोटी रुपयांच्या नोटा बाजारात

Horoscope: पैसा खळाळणार! त्रिपुष्कर योग ठरणार फलदायी; 'या' 5 राशींचे दिवस बदलणार

Goa Accident: डिचोलीत भीषण अपघात! बगलमार्गावर व्हाळशी जंक्शनजवळ वाहनाची झाडाला जोरदार धडक; कर्नाटकातील तिघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT