Dabolim Airport: दाभोळी विमानतळावरून एकापाठोपाठ एक विमान कंपन्या मोपाकडे स्थलांतरित होत असतानाच कतार एअरवेज जूनच्या मध्यापासून त्यांची ऑपरेशन्स मोपावर स्थलांतरित करणार असल्याची माहिती समोर आल्यावर राज्यात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांत चांगलीच खडाजंगी सुरु झाल्याचे दिसतंय.
त्यातच गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी मंत्री आणि दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांच्यावर शरसंधान साधले आहे.
GMR कंपनीचे सरकारवर दबाव टाकून मोपा विमानतळावर विमाने वळविणे चालू असून स्वत:च्या मतदारसंघात असलेले दाबोळी विमानतळ आमदार माविन गुदिन्हो यांना वाचविता येत नसेल तर अशा हतबल मंत्री आणि आमदाराने राजीनामा द्यावा असे विजय सरदेसाई यांनी या पोस्ट मध्ये म्हटले आहे.
कतार एअरवेजने नुकतेच येत्या 20 जूनपासून दाबोळीवरील ऑपरेशन्स मोपावर स्थलांतरित करण्याची घोषणा केलीय. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जीएमआर कंपनी दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप पंचायत आणि वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी केला होता.
दाबोळी विमानतळ घोस्ट होईल, अशी भीती विरोधकांकडून व्यक्त केली जात असतानाच आता सरदेसाई यांनी मंत्री आणि दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांच्यावर शरसंधान साधले आहे.
कतार एअरवेजने जून 2024 पासून त्यांची सर्व उड्डाणे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलविण्याच्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याबद्दल भाजप सरकारवर टीका केली.
मी 2022 मध्ये सरकारला इशारा दिला होता की दाबोळी विमानतळ "घोस्ट एअरपोर्ट" होईल. दाबोळी विमानतळ सुरू ठेवण्यासाठी मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना त्वरित पाऊले उचलण्याची विनंती केली होती.
दुर्दैवाने, भाजप सरकार विविध विमान कंपन्यांच्या ऑपरेशन्सच्या स्थलांतराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.