Cyber Security News Dainik Gomantak
गोवा

Cyber Security: ऑनलाईन गुन्हे रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील; गोव्याच्या सुरक्षेसाठी तयार करणार "सायबर योद्धा"

Cyber Security Goa: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी "सायबर योद्धा" हा उपक्रम राबवण्यावर भर दिला आहे

Akshata Chhatre

पणजी: वाढत्या सायबर गुन्ह्यांवर आळा बसवण्यासाठी गोवा सध्या प्रयत्नशील आहे. गोव्यातील सायबर गुन्ह्यांचे प्रयत्न कमी करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी "सायबर योद्धा" हा उपक्रम राबवण्यावर भर दिला आहे.

या उपक्रमात काही व्हॉलेंटियर्स ऑनलाईन धोक्यांपासून कसं वाचता येईल याबद्दल लोकांना शिक्षित करतील आणि या उपक्रमाअंतर्गत अधिकाधिक लोकांपर्यंत याचा फायदा पोहोचेल यावर काम केलं जाईल. सध्या गोवा पोलीस या व्हॉलेंटियर्सना गुन्हे शोधण्यासाठी, ट्रेंड समजून घेण्यासाठी आणि इतरांना ऑनलाइन सुरक्षित कसे राहायचे हे शिकवण्यासाठी प्रशिक्षण देत आहेत.

राज्यात होणारी सायबर फसवणूक कमी व्हावी म्हणून २४/७ सायबर हेल्पलाइन देखील सुरू करण्यात आली आहे. यात फसवणूक करणाऱ्यांची खाती गोठवण्यासाठी त्वरित कारवाई करण्यावर भर दिला जाईल. गोव्याने पोलिसांना डेटाचे विश्लेषण करण्यात आणि गुन्ह्यांशी लढण्यासाठी मदत करण्यासाठी AI-ML लॅब सुरू केली. त्यांनी या उपक्रमासाठी स्थानिक टेक कंपनीसोबत भागीदारी देखील केली आहे.

वाहतूक व्यवस्थापनासाठी गोव्याने ‘क्विक पास’ ॲप विकसित केले आहे. हे ॲप ड्रायव्हर्सना ट्रॅफिक नियमांचे पालन केल्याचे सिद्ध करण्यासाठी आणि त्रास टाळण्यासाठी एक क्यूआर कोड तयार करू देते. लवकरच इतर राज्ये देखील हे ॲप स्वीकारतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. सध्या गोवा पोलीस ट्रॅकिंग सेंटर, क्यूआर कोड फीडबॅक सिस्टीम आणि भाषांतरासाठी तंत्रज्ञानाचा सक्रियपणे वापर करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पाहताक्षणी विजयनगर साम्राज्याच्या प्रेमात पडला होता पोर्तुगीज व्यापारी; वाचा 400 वर्षापूर्वीचे प्रवास वर्णन

Rashi Bhavishya 26 September 2025: कुटुंबात सौख्य वाढेल, प्रेमसंबंधात गोडवा; परदेशातून शुभवार्ता येणार

Jasprit Bumrah: आधीही चुकीचा होतास आत्ताही! रोहित-सूर्याच्या कप्तानीखाली गोलंदाजीची तुलना करणाऱ्या कैफला बुमराहने दिलं सडेतोड उत्तर

धक्कादायक! शेवपुरी खाणं बेतलं जीवावर, दोडामार्गच्या 35 वर्षीय तरुणाचा गोव्यात मृत्यू

Child Health Tips: पालकांनो, दुर्लक्ष नका करु! मुलांच्या आरोग्यासाठी वर्षातून एकदा हिमोग्लोबिन तपासणी का करावी? योग्य पातळी किती असावी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT