Cyber Hotel  Dainik Gomantak
गोवा

Goa: सायबर चोरट्यांचा पर्यटकांच्या पैशांवर डल्ला; हॉटेल बुकिंगच्या नावाखाली लाखो रूपयांची फसवणूक

गोव्यातून मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Cyber Crime: पर्यटकांनी गोव्यात (Goa) राहण्यासाठी ऑनलाईन बुक (Online Booking) केलेल्या हॉटेल भाड्याच्या पैशांवर सायबर चोरटे डल्ला मारत आहेत. ऑनलाईन व्यवहारात त्रयस्थ व्यक्ती घुसल्याने पर्यटकांना (Tourist) मोठ्या नुकसाणीचा सामना करावा लागत आहे. बुक केलेल्या हॉटेलचे व्यवस्थापन देखील यापासून अनभिज्ञ राहत आहे. गोव्यातून मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत.

कांदोळी परिसरातील एका आंतरराष्ट्रीय हॉटेल मध्ये देखील अशीच घटना घडल्याचे ऑगस्ट महिन्यात समोर आले. हॉटेल बुक केलेल्या व्यक्तीने हॉटेलमध्ये संपर्क साधला असता असे कोणतेही बुकिंग झाले नसल्याचे हॉटेल व्यवस्थानाने सांगितले. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. मागील पाच महिन्यात गोव्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये गोव्यात हॉटेल शोधात असलेल्या लोकांना ऑनलाईन पद्धतीने गंडा घातला आहे.

गुगलवरील माहिती केली जाते एडिट

गोव्यातील जवळपास सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंटची माहिती आणि संपर्क क्रमांक गुगवर उपलब्ध आहे. सायबर चोरटे संबधित हॉटेल्स, रेस्टॉरंटची माहिती एडिट करण्यासाठी गुगलकडे परवानगी मागतात. गुगल ही माहिती मेलद्वारे संबधित हॉटेल्स, रेस्टॉरंटला कळवते. पण, हॉटेल्स, रेस्टॉरंट मालक गुगलकडून येणारे अशा मेल्सकडे दुर्लेक्ष करतात. त्यानंतर येणारा OTP सायबर चोरटे स्वत: हॉटेल्स, रेस्टॉरंटला फोन करून गुगलमधून बोलत असल्याचे सांगून घेतात.

गुगलचा अॅक्सेस मिळाल्यानंतर चोरटे गुगलवरील हॉटेल्स, रेस्टॉरंटची माहिती संपादित करतात. आणि स्वत:चे नंबर तिथे टाकतात. पर्यटक जेव्हा या नंबरवरती संपर्क करतात तेव्हा हे चोरटे त्यांच्याकडून बुकिंग आणि पैसे घेऊन फसवणूक करतात.

अनेक पर्यटकांची अशा प्रकारे फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यात जवळपास 22 लाख रूपयांची फसवणूक झाली असून, अजून हा आकडा वाढू शकतो. याप्रकरणी गोवा सायबर पोलिसांत (Goa Cyber Police) तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT