Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Cyber ​​Crime: बोगस कराराद्वारे 40 कोटी लाटणाऱ्या परराज्यातील दोघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; गुन्ह्याची नोंद

Goa Police: गोव्यातील व लोह खनिज व्यवसायाशी संबंधित एस. ए. एक्स्पोर्ट कंपनीचा बोगस ईमेल तयार करून सुमारे चाळीस कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील व लोह खनिज व्यवसायाशी संबंधित एस. ए. एक्स्पोर्ट कंपनीचा बोगस ईमेल तयार करून सुमारे चाळीस कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गोवा सायबर गुन्हे पोलिसांनी देवल शारदा (होस्पेट, कर्नाटक मूळ सिंगापूर) आणि अतूल दीपकभाई पटेल (होस्पेट, कर्नाटक) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर गुन्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी कटकारस्थान रचून एस. ए. एक्स्पोर्ट कंपनीचा बनावट ईमेल तयार केला. या कंपनीच्या सर्व व्यवहारासाठी व कायदेशीर निर्णय घेण्यासाठी संशयितांना अधिकर असल्याचा दावा करून २४ जून २०२४ रोजी तक्रारदाराच्यावतीने बोगस करार केला. त्यामध्ये लोह खनिज निर्यातदार कंपनीचा ४० कोटींचा आर्बिटेशन दावा ३.११ कोटींत निकाली काढत फसवणूक करण्यात आली होती व उर्वरित रक्कम तक्रारदाराला कोणतीही कल्पना न देता देवल या संशयिताने अतुलच्या बँक खात्यात हस्तांतरीत केले, असे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

विदेशातील एका कंपनीसोबतच्या आर्बिटेशन प्रक्रियेत मदत करुन पैसे परत मिळवून देण्यासाठी या दोन्ही संशयितांनी तक्रारदाराला आश्वासन दिले होते. मात्र या दोघाही संशयितांनी तक्रारदाराला कोट्यवधींना गडा घातल्याने भारतीय नागरिक संहितेच्या कलम १११(२), ३१८ (४), ३३६ (२), ३(५) व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६सी व ६६ डी खाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

SCROLL FOR NEXT