Goa Cyber Crime: सायबर पोलिसांनी वाचवले ३.७३ कोटी!

Goa Cyber Crime Police: सायबर गुन्हेगारांपासून बचाव करण्यास पोलिसांकडून १९३० हेल्पलाइन क्रमांक जारी
Goa Cyber Crime Police: सायबर गुन्हेगारांपासून बचाव करण्यास पोलिसांकडून १९३० हेल्पलाइन क्रमांक जारी
Goa Cyber CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : सायबर पोलिसांकडून इंटरनेट विश्वात होत असलेल्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू असतात. अशाच एका प्रयत्नांना यश आल्याने सायबर पोलिसांकडून ३.७३ कोटी रुपये वाचविण्यात यश आले. सायबर गुन्हेगारांपासून बचाव करण्यास पोलिसांकडून १९३० हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला होता आणि यामुळेच हे शक्य झाल्याची माहिती सायबर विभागाचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

गुप्ता यांनी सांगितले की, सायबर गुन्हेगारीविरुद्ध लढा सर्व आघाड्यांवर द्यावा लागतो. एकीकडे सायबर गुन्हेगारांच्या गुन्हेगारीचा तपास करावा लागतो तर दुसरीकडे सायबर गुन्हेगारी होऊ नये यासाठी काम करावे लागते. असे गुन्हे घडू नये यासाठी लोकांमध्ये जागृती करणे व आपत्कालीन सहाय्यतेसाठी हेल्पलाइन क्रमांक देणे महत्त्वाचे असते.

गुप्ता म्हणाले की, १०३० या क्रमांकावर संपर्क साधून कुणीही सायबर गुन्हे संबंधी मदत मागू शकतात. या हेल्पलाइनमुळे लोकांची फार मोठी मदत आजवर झाली आहे. याच उपक्रमांमुळे सायबर गुन्हेगारांनी फसवून लुटलेले ३.७३ कोटी रुपये वाचविण्यास विभागाला यश आले.

Goa Cyber Crime Police: सायबर गुन्हेगारांपासून बचाव करण्यास पोलिसांकडून १९३० हेल्पलाइन क्रमांक जारी
Cyber Crime: देशात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ; अवघ्या 4 महिन्यांत तब्बल 7000 कोटींची फसवणूक

लोभ, विश्वास आणि अज्ञानामुळे गुन्हे !

गोठविण्यात आलेली रक्कम पीडितांना परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लोभ, विश्वास ठेवणे आणि अज्ञानामुळे सायबर गुन्हे घडत आहेत. सायबर गुन्हेगार लोकांच्या लवकर पैसे कमावण्याच्या लोभी वृत्तीचा गैरफायदा घेतात. सायबर गुन्हेगार अनेकदा पीडितांचा विश्वास लवकर मिळवून त्यांची फसवणूक लवकरच करतात. अज्ञानामुळे असुरक्षित अनोळखी लिंक्स क्लिक करणे आणि बेजबाबदार कृती करून आपली गोपनीय माहिती देणे हे देखील महत्त्वाचे कारण असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com