Curfew in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Curfew: संचारबंदीत वाढ; बार ॲण्‍ड रेस्‍टॉरंट रात्री 11 पर्यंत खुले

कर्फ्यू आणखी 15 दिवस वाढताना दुकाने खुली ठेवण्याची मुदत 3 वाजेपर्यंत करण्यात आली. त्यानंतर सरकारने मॉल्समधील दुकाने तसेच मासेमारी मार्केट खुले करण्यास परवानगी दिली.

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील (Goa) कोरोनाची (Covid-19) स्थिती नियंत्रणात येत आहे. तरीसुद्धा प्रत्‍येक दिवशी मृत्यूचे प्रमाण काहीअंशी सुरूच आहे. संचारबंदीत (Curfew) उठविल्यास लोकांवर निर्बंध राहणार नाहीत. म्‍हणूनच सरकारने एक आठवडाभर म्हणजे 9 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी वाढवली आहे. मात्र बार (Bar) ॲण्‍ड रेस्‍टॉरंट (Restaurant) रात्री 11 वाजेपर्यंत खुले ठेवण्‍यास मुभा देण्‍यात आली आहे. (Goa Curfew: Bar and Restaurant open till 11 pm from today)

संचारबंदीत वाढ करताना राज्यातील कॅसिनो, सभागृहे, कम्युनिटी हॉल किंवा तत्सम जागा, रिव्हर क्रूझ, वॉटर पार्क, करमणूक उद्याने, स्पा, मसाज पार्लर, सिनेमा हॉल, थिएटर, मल्टिप्लेक्स, शॉपिंग मॉल्समधील मनोरंजन झोन खुले करण्‍यास परवानगी देण्‍यात आलेली नाही. गेल्या रविवारी (26 जुलैला) सरकारने संचारबंदीत आठवडाभराने वाढ केली होती. ती मुदत उद्या 2 ऑगस्टला सकाळी 7 वाजता संपणार आहे.

यावर्षी 9 मे रोजी राज्यात सुरुवातीला 15 दिवसांचा कर्फ्यू लागू करताना दुपारी 1 वाजेपर्यंत काही जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर हा कर्फ्यू आणखी 15 दिवस वाढताना दुकाने खुली ठेवण्याची मुदत 3 वाजेपर्यंत करण्यात आली. त्यानंतर 20 जूनला सरकारने मॉल्समधील दुकाने तसेच मासेमारी मार्केट खुले करण्यास परवानगी दिली. त्‍यानंतर सरकारने संचारबंदीी आठवडाभराने वाढताना निर्बंध उठवण्यास सुरुवात केली.

पॉझिटिव्‍हिटी टक्केवारी घटली

राज्यातील कोरोना पॉझिटिव्‍हिटी टक्केवारी (1.92 टक्के) घटली आहे. गेल्या काही दिवसांत नोंद झालेल्या कोरोनाबाधितांचे प्रमाण 90 ते 150 च्या दरम्यान नोंद झाले आहे. केंद्राशी चर्चा करून इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे. त्यानंतरच राज्यात शैक्षणिक वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली जाईल. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 30 दिवसांच्या फरकाने कोरोनाचे दोन डोस देण्याच्या परवानगीसाठी केंद्राला विनंती करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT