Goa Curfew: राज्यात संचारबंदी पुन्हा वाढली; मुख्यमंत्र्यांनी दिली माहीती

Goa Curfew: राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विट करुन याबद्दल माहिती दिली आहे.
Goa Curfew has been extended up to 2nd august: CM Pramod Sawant
Goa Curfew has been extended up to 2nd august: CM Pramod SawantDainik Gomantak

गोव्याच्या संचारबंदीत (Goa Curfew) वाढ करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातली संचारबंदी 2 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापुर्वी संचारबंदी 26 जुलै पर्यंत होती, त्यामध्ये वाढ करून ही संचारबंदी वाढवण्यात आली आहे. सध्या लागु असलेल्या नियम व अटी या संचारबंदीत सुद्धा लागु असणार आहे. त्यामुळे कॅसिनो (Casinos in Goa), मसाज पार्लर व्यावसायिकांचा पुन्हा एकदा अपेक्षाभंग झाला आहे. (Curfew has been extended up to 2nd august in Goa)

राज्यामध्ये कोरोना महामारीची परिस्थिती दिवसेंदिवस सुधारत असल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे संचारबंदीत आणखी काही शिथिलता करतील अथवा ती कायमची उठवतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ही संचारबंदी कायम ठेवण्यात आल्याने आणखी काही दिवस राज्यातील कॅसिनो, सभागृह, कम्युनिटी हॉल किंवा तत्सम जागा, रिव्हर क्रूझ, वॉटर पार्क, करमणूक उद्याने, स्पा, मसाज पार्लर, सिनेमा हॉल, थिएटर, मल्टिप्लेक्स, शॉपिंग मॉल्समधील मनोरंजन झोन असलेल्या व्यावसायिकांना वाट पाहावी लागणार आहे.

राज्यात संचारबंदीमध्ये आणखी एक आठवडा वाढ करण्यात आल्याने सर्व आस्थापने व दुकाने संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. 9 मे पासून राज्यस्तरीय संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर आता प्रत्येक आठवड्याला राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेत ती काही प्रमाणात शिथिल करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com