Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa News: कुडचडेत जलवाहिनी फुटून पाण्याची नासाडी

Goa News: गोव्यात भूमिगत केबल घालताना अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटून मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होऊ लागली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: भूमिगत केबल घालताना अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटून मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होऊ लागली आहे. अशीच एक घटना होडर-शेळडे येथे घडली व हजारो लिटर पाणी वाया गेले. पाणी विभागाच्‍या सुस्‍त कारभारामुळे नागरिकांनी मात्र तीव्र संताप व्यक्त केला.

होडर-शेळडे येथे भुयारी वीजवाहिन्या घालण्यासाठी कंत्राटदाराने अनेक ठिकाणी खोदकाम सुरू केले आहे. त्‍यामुळे जलवाहिन्‍यांना धोका निर्माण झाला होता. आज ही भीती खरी ठरली. मुख्य रस्त्यावर पाण्याची जलवाहिनी फुटून पाण्याची नासाडी झाली.

याबाबत शिवयोद्धा संघटनेचे उपाध्यक्ष राजू मोरजकर यांनी सांगितले की, कंत्राटदार आपले काम वेळेत पूर्ण करण्‍यासाठी घाईगडबडीत अनेक ठिकाणी जलवाहिनीला धोका निर्माण करतात. तीच गोष्ट होडर येथे घडली.

भुयारी वीजवाहिन्या (Power Lines) घालताना जलवाहिनीला धोका निर्माण शेवटी ती फुटलीच. कुडचडेचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी याप्रश्‍‍नी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT