Goa Mine | Nilesh Cabral | Mine Workers
Goa Mine | Nilesh Cabral | Mine Workers Dainik Gomantak
गोवा

Goa Mine: 'कोडली खाण लवकरात लवकर सुरु करा' नीलेश काब्रालांना साकडे

दैनिक गोमन्तक

Goa Mine: कोडली - दाभाळ येथील सेसा गोवा खाण कंपनीच्या कामगारांनी काल कुडचडेचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांची भेट घेऊन खाण लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी केली.

काब्राल यांच्या कार्यालयाजवळ काल सकाळी कामगारांनी त्यांची भेट घेऊन उत्तर गोव्यातील सेसा कंपनीच्या खाणीतील खनिजाचा लिलाव करून काम सुरु करण्यात आले आहे, पण कोडली येथील काम कधी सुरू करणार असा प्रश्न केला असता काब्राल यांनी सध्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रायोगिक तत्त्वावर काही प्रमाणात लिलाव केला आहे व यातून काही त्रुटी निघाल्यास त्या दूर करून बाकी ठिकाणच्या खाणीवरील मालाचा लिलाव करण्यात येणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री खाणी सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असून हा व्यवसाय लवकरात लवकर सुरू व्हावा अशी सरकारचीही इच्छा आहे. त्यादृष्टीने काम सुरू आहे. खाण व्यवसायावर बरेच लोक अवलंबून असल्याने सरकार गंभीरतेने यावर विचार करीत असून मुख्यमंत्री सावंत यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून लोकांनी आणखी थोडा धीर धरावा, असे काब्राल यांनी सांगितले.

चाळीसही आमदारांची घेणार भेट

गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही खाणी सुरू होणार या आशेवर जगत आलो आहोत, आता आमचे वयही उलटून गेल्याने दुसऱ्या ठिकाणी आम्हाला नोकरी कोण देणार असा प्रश्न कामगारांनी उपस्थित केला. खाणीवर काम करून आम्ही आमच्या कुटुंबाचे पोट भरत होतो, पण हा व्यवसाय बंद पडल्याने आमच्यावर मोठे संकट आले आहे.

त्यामुळे सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे हा व्यवसाय लवकरात लवकर सुरू करावा यासाठी आम्ही चाळीसही आमदारांची भेट घेणार असल्याचे कामगारांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT