Goa Government: 'राम राज्य' नव्हे, हे तर 'रम राज्य' अमरनाथ पणजीकरांची जहरी टीका

Goa Government: राजधानीतील आझाद मैदानाचा वापर दारु पिण्यासाठी लोक करीत आहेत.
Goa Government | Amarnath Panajikar
Goa Government | Amarnath PanajikarDainik Gomantak

Goa Government: राजधानीतील आझाद मैदानाचा वापर दारु पिण्यासाठी लोक करीत आहेत. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली ‘राम राज्य’ नव्हे ‘रम राज्य’ सुरू असल्याची टीका काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा भेटीदरम्यान पुष्पचक्र अर्पण केलेल्या राजधानी पणजीतील आझाद मैदानाचा वापर आज दारूडे करू लागले आहेत.

भाजप सरकार स्वातंत्र्यसैनिकांचा अशाप्रकारे अपमान करीत असल्याचा आरोपही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे. आझाद मैदानात बसून दिवसाढवळ्या खुलेआम दारू पिणाऱ्यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना पणजीकर यांनी भाजप सरकारच्या बेगडी हिंदुत्व आणि बनावट देशभक्तीची खिल्ली उडवली आहे.

Goa Government | Amarnath Panajikar
Goa News: गोव्यात सरस्वतीचा संचार थांबविणाऱ्यांना बेताळच पाहून घेईल- देवदत्त पटनायक

भाजप आपल्या राजकीय फायद्यासाठी हिंदू धर्म आणि संस्कृतीचा अशाप्रकारे अपमान करत आहे, याचा पर्दाफाश केला होता. राज्य पोलिस मुख्यालयाच्या अगदी समोर असलेले आझाद मैदान जेथे हुतात्मा स्मारक, डॉ. टी. बी. कुन्हा स्मारक आहे. ही ठिकाणे आता मद्यपी आणि जुगाऱ्यांचा अड्डा बनली आहेत. भाजप सरकारला स्वातंत्र्यसैनिकांबद्दल आदर नसल्याचा आणि सरकारचे कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण नसल्याचा हा पुरावा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

‘स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांची माफी मागा’

पवित्र आझाद मैदानावर मद्यपींना मोकळीक देऊन लोकांच्या भावनांचा अपमान केल्याबद्दल मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांची आणि गोव्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणीही अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com