Cuncolim Industrial Estate Dainik Gomantak
गोवा

Cuncolim Industrial Estate: समस्यांचे ग्रहण काही सुटेना; आक्रमक स्थनिकांचा सरकारला इशारा, 'आता तरी तातडीने पावले उचला अन्यथा...'

Cuncolim Industrial Estate: फिश मिल बंद होऊनही उग्र आणि असह्य वास या परिसरात पसरला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Cuncolim Industrial Estate: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीच्या समस्यांचे ग्रहण काही केल्या सुटत नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

कुंकळ्ळीवासियांच्या भावना दिवसागणिक अधिकच तीव्र होत असून वाढत्या प्रदूषणामुळे रहिवाश्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

औद्योगिक वसाहतीमधील फिश मिल सील संबंधी वादग्रस्त वातावरण निर्माण झाल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यावर कारवाई केली होती.

मात्र फिश मिल बंद होऊनही उग्र आणि असह्य वास या परिसरात पसरला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच कारखान्यातून धूर सोडताना संबंधित कंपनी फिल्टरचा वापर न करता धूर उत्सर्जित करत असल्याने परिसरातील झाडाझुडुपांपासून घरांच्या भिंतींवर काळ्या रंगाचे धुलीकण चिकटून बसत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

सदरच्या प्रकाराने स्थानिक हैराण झाले असून सरकार आमच्या जीविताशी का खेळतंय असा आक्रमक सूर त्यांनी पत्रकारांसमोर आळवला.

इथली परिस्थिती अनुभवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांनी रात्रीच्या मुक्कामासाठी कुंकळ्ळी यावे, मोकळा श्वास घेणे म्हणजे काय असते हे त्यांना समजेल असे आव्हान देखील त्यांनी केली.

तसेच आमची मुख्यमंत्री, राज्यपाल,औद्योगिक मंत्री, विरोधी पक्षनेते यांनी विनंती आहे की, कुंकळ्ळीतील प्रदूषण रोखण्यासाठी आता तरी तातडीने पावले उचलावीत अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरण्यास भाग पडून नये असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT