Shree Shantadurga Kunkalikarin | Shri Shantadurga Kunkalikarin Fatorpa Panjim | Shree Shantadurga Kunkalikarin Jatra Dainik Gomantak
गोवा

Shree Shantadurga Kunkalikarin : श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणचा जत्रोत्सव उत्साहात; मिरवणुकीने झाली सांगता

महारथ मिरवणुकीला यंदा जणू भक्तांचा महापूरच लोटला होता.

दैनिक गोमन्तक

कुंकळ्ळी: फातर्फा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण जत्रोत्सवाची 1 रोजी पहाटे महारथ मिरवणुकीने सांगता झाली. 31 डिसेंबरला रात्री धार्मिक विधी आरत्या व प्रसाद झाल्यावर रविवारी पहाटे साडे सहा वाजता देवीला खास सजविलेल्या महारथात बसविण्यात आले. धार्मिक विधी झाल्यावर देवीची महारथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महाजन, कुळावी व देवीच्या हजारो भक्तांनी आनंद लुटला. (Shree Shantadurga Kunkalikarin)

महारथ मिरवणुकीला यंदा जणू भक्तांचा महापूरच लोटला होता. भक्तांनी हरहर महादेवाच्या गजरात व देवीचा जयजयकार करीत देवीचा रथ ओढला. मंदिराच्या मुख्यद्वारापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. हजारो भक्तांच्या उपस्थितीत महारथात विराजमान झालेल्या देवीची मिरवणूक आकार उदेगीच्या मंदिराला वळसा घालून मुख्य मंदिराची प्रदक्षिणा घातली. त्यानंतर प्रवेशद्वाराकडे विसर्जित करण्यात आली. मिरवणुकीच्या वेळी भक्तांनी रथावर केळी, लाडू व धनाचा वर्षाव केला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी आपल्या परिवारासह देवीचे दर्शन घेतले. संस्थान समितीचे अध्यक्ष कवेंद्र देसाई, समितीचे सदस्य सुभाष देसाई, विराज देसाई व दर्शन देसाई यांनी जत्रोत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले गोवा पोलिस, वाहतूक पोलिस, अग्निशमन दल, सार्वजनिक बांधकाम खाते, वीज खाते, स्थानिक पंचायत व केपे महसूल खात्याचे जत्रोत्सव यशस्वी करण्यासाठी सहयोग लाभले. मंगळवार 2 ते 6 जानेवारीपर्यत देवीला अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तूचा लिलाव पुकारण्यात येणार आहे.

सोमवारी जागराने सांगता

सहा दिवस चाललेल्या जत्रोत्सवात देवीची पंचमीला पालखीतून, षष्टीला अंबारी रथातून, सप्तमीला फुलांच्या रथातून, अष्टमीला विजय रथातून तर दशमीला महारथातून मिरवणूक काढण्यात आली. सोमवारी जागराने जत्रोत्सवाची सांगता झाली. जत्रोत्सवाच्या निमित्ताने हजारो भक्तांनी या निमित्त देवीचे दर्शन घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasudev Balwant Phadke: नोकरीला लाथ मारली, अन्यायाविरुद्ध लढा उभारला, इंग्रजांना सळो की पळो केलं, पण फंद फितुरीनं घात केला; वाचा वासुदेव बळवंत फडकेंची संघर्षगाथा!

Goa Vehicle Theft Case: मायणा कुडतरी पोलिसांची मोठी कारवाई, वाहन चोरीप्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या; 5 दुचाकीही जप्त

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर करुन मुस्लिम वृद्धाशी लावलं लग्न; कोर्टानं दिला 'हा' निर्णय

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT