Goa Culture Dainik Gomantak
गोवा

Goa Culture : श्री माऊली देवीच्या भेटीचा अलौकिक सोहळा उत्साहात

गोवा, कर्नाटक व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक अनुबंधाचे प्रतिक असलेली प्रसिद्ध श्री माऊली देवीच्या भेटीचा अलौकिक सोहळा आज पार पडला.

दैनिक गोमन्तक

Culture of Goa: गोवा, कर्नाटक व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक अनुबंधाचे प्रतिक असलेली प्रसिद्ध श्री माऊली देवीच्या भेटीचा अलौकिक सोहळा आज पार पडला. यावेळी देशभरातील भक्तांनी हा दैदिप्यमान सोहळा पाहणीसाठी अलोट गर्दी केली होती.

परंपरेप्रमाणे ही जत्रा बारा वर्षांनंतर होत असते. मात्र, गेली दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्याने यंदा तब्बल 14 वर्षांनी ही जत्रा संपन्न झाली.

आज सकाळी 9 वाजता ढोल-ताशांच्या गजरात कणकुंबीतून श्री माऊली देवीची पालखीने धुळ्याच्या वरंड्याकडे प्रस्थान केले. त्यानंतर कोदाळी व चिगुळे येथील माऊलींच्या पालख्या आल्या.

यावेळी भेटीचा सोहळा पार पडल्यानंतर पालख्या मलप्रभा नदीच्या घाटावर येऊन कळसांचा पवित्र स्नान सोहळा संपन्न झाला. त्यानंतर सर्व पालख्यांचे आगमण माऊली देवस्थानात होऊन स्थानापन्न झाल्या. त्यानंतर सर्व पालख्या माऊली देवस्थानात स्थानापन्न झाल्या. 15 फेब्रुवारीपर्यंत ही जत्रा असणार आहे.

असा झाला सोहळा

महाराष्ट्रातील कोदाळी, गुळंब, कळसकादे, केंद्रे-वीजघर व चिगुळे येथील श्री माऊलीदेवी कणकुंबीच्या श्री माऊली देवीला भेटण्यासाठी सकाळी ९ च्या सुमारास धुळ्याच्या वरंड्याकडे आल्या.

यानंतर कणकुंबी माऊलीदेवी पालखीसह वाजतगाजत धुळ्याच्या वरंड्याकडे रवाना झाली. सर्व माऊलींची येथे भेट झाली. या सोहळ्याला असंख्य देवीभक्त उपस्थित राहिले.

सांस्कृतिक अनुबंधाचे प्रतिक

श्री माऊली देवी जत्रोत्सव हा गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांचे एकमेकांशी असलेली सांस्कृतिक तसेच अनुबंध दर्शवितो. महाराष्ट्रातील कोदाळी, केंद्रे (ता. चंदगड) येथून श्री माऊली देवीची पालखी भेटीसाठी येते.

तसेच कर्नाटक व गोवा सिमेवर असणाऱ्या कणकुंबी व चिगुळे येथील श्री माऊली देवींचा भेट सोहळ्या धुळ्याचा वरंडा येथे संपन्न होते.

यामुळे होते बहिणींची भेट

आख्यायिकेनुसार, सात माऊली देवींच्या बहिणींच्या भेटीचा सोहळा दर बारा वर्षांनी होतो. बारा वर्षांनी गुरू जेव्हा मकर राशीत येतो, त्यावेळी कणकुंबी व चिगुळे येथील श्री माऊली देवीच्या तीर्थकुंडातील पाणी एक ते दोन फूट वर येते.

त्यावेळी ते पाणी पांढरे शुभ्र दुधाप्रमाणे होते. या पर्वणीला गंगा भगीरथी अवतरली, असे समजून बारा वर्षांनी या सर्व भगिनींच्या म्हणजे माऊलींच्या भेटीचा सोहळा रंगतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

Goa News Live Updates: मोबाईलवर नको, मैदानावर खेळा

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

SCROLL FOR NEXT