Goa Lokotsav 2023 | Goa culture Dainik Gomantak
गोवा

Goa Lokotsav 2023 : 2 वर्षांच्या विश्रांतीनंतर लोकोत्सवात कलावंतांचे पुनरागमन; पहा ही खास छायाचित्रे

दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर आयोजित होणाऱ्या या वार्षिक महोत्सवात देशभरातील पारंपारिक कलाकार आणि लोककलावंतांना त्यांची कला प्रदर्शित करण्यासाठी आणि विक्रीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Culture of Goa Lokotsav 2023 : गोव्यात लोकोत्सवाला सुरुवात झाली आहे. गोवा हे पर्यटन राज्य असल्याने लोकोत्सव 2023 मधील कलाकृतींना व्यासपीठ मिळण्यास मोठा वाव आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कला अकादमी येथे राष्ट्रीय स्तरावरील असलेल्या लोक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.

Goa Lokotsav 2023

दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर आयोजित होणाऱ्या या वार्षिक महोत्सवात देशभरातील पारंपारिक कलाकार आणि लोककलावंतांना त्यांची कला प्रदर्शित करण्यासाठी आणि विक्रीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

लोकोत्सवाच्या माध्यमातून आपली हस्तकला लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृतीला व्यासपीठ मिळत आहे. देशभरात कला आणि हस्तकला एकत्र आल्याने कोविड महामारीनंतर लोकोत्सवाच्या माध्यमातून लोकसंगम आणि कलासंगम दिसून येत आहे.

लोकत्सवाची उच्चता कलाकारांमुळे वाढते. अनेक पर्यटक या महोत्सवाला भेट देतात. स्वयंपूर्ण गोवा 2.0 च्या माध्यमातून ग्रामीण कलाकारांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

उद्घाटनासाठी उपस्थित असलेले राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा म्हणाले की, असा महोत्सव भारतातील विविधतेचे दर्शन घडवतो.

Goa Lokotsav 2023

या लोकोत्सवात राजस्थान, आसाम, मणिपूर, गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि गोवा ही बारा राज्ये सहभागी आहेत.

मुख्यमंत्री सावंत यांनी पंतप्रधानांच्या ‘वोकल फॉर लोकल’ या घोषणेचा पुनरुच्चार करत स्थानिक उत्पादने जागतिक बाजारपेठेतही पोहोचली पाहिजेत, असे सांगितले.

लवकरच होणार्‍या G-20 शिखर परिषदेच्या माध्यमातून भारत सरकार स्थानिक पातळीवर बनवलेल्या उत्पादनांची जागतिक स्तरावर बाजारपेठ करण्याचा प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले.

Goa Lokotsav 2023

दरम्यान, लोकोत्सवासाठी उभारलेल्या भव्य मंचावर गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन घडले. त्यासोबत भारतीय संस्कृतीचीदेखील विविध प्रतीके या मंचावर पाहायला मिळाली.

गोमंतकीय वास्तुकला, कार्निव्हल, वीरभद्र, शिमगोत्सव, घोडेमोडणी, चित्रकला, संगीत यांची प्रतीके साकारल्याने मंच आकर्षण ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेची पडताळणी होणार, अपात्र शिक्षकांना घरी पाठवणार; मुख्यमंत्र्यांची तंबी

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठी भेट; 6 अतिरिक्त विशेष गाड्यांची केली घोषणा!

Sunburn Festival 2025: बरं झालं! सनबर्न गोव्याबाहेर गेल्यावर मंत्री नाईकांची प्रतिक्रिया; म्हणाले, आपली संस्कृती-परंपरा सुरक्षित राहील

Ravichandran Ashwin: 'तुम्ही जे पेराल ते उगवेल'! स्टोक्सच्या 'मस्करी'ला अश्विनचे सडेतोड उत्तर; जाणून घ्या नेमके प्रकरण?

Numerology: जन्मतारखेत दडलेय 'कर्माचे फळ'; या तारखांना जन्मलेल्यांना संघर्ष आणि यशासाठी वाट का पहावी लागते?

SCROLL FOR NEXT