Goa Marine Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Cruise Tourism: 67500 पर्यटक गोव्यात दाखल होणार! सागरी पर्यटन हंगामाचा 2रा टप्पा; 'क्रिस्टल सिमफोनी' पोचणार मुरगाव बंदरात

Goa Marine Tourism: दरम्यान २०२५-२६ या पर्यटक हंगामात एमव्ही एम्प्रेस या देशांतर्गत पर्यटक जहाजाच्या एकूण २७ फेऱ्या सप्टेंबर २०२५ ते २३ जूनपर्यंत मुरगाव बंदरात होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: गोव्यातील सागरी पर्यटन हंगामाच्या पहिल्या टप्प्याची सांगता २९ डिसेंबर रोजी एमव्ही एम्प्रेस या देशांतर्गत पर्यटक जहाजाने झाली. २०२५-२६ या पर्यटक हंगामाची सुरुवात याच क्रुझ जहाजाने झाली होती. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात ४२७० पर्यटक गोव्यात दाखल होणार आहेत.

या जहाजातून १०५० पर्यटक मुरगाव बंदरात दाखल झाले. नंतर सुमारे ८४८ प्रवासी अगाती लक्षद्वीपच्या पुढील प्रवासासाठी निघाले. दरम्यान २०२५-२६ या पर्यटक हंगामात एमव्ही एम्प्रेस या देशांतर्गत पर्यटक जहाजाच्या एकूण २७ फेऱ्या सप्टेंबर २०२५ ते २३ जूनपर्यंत मुरगाव बंदरात होणार आहे. २०२५-२६ या पर्यटक हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात १७ जानेवारी २०२६ रोजी क्रिस्टल सिमफोनी या विदेशी पर्यटक जहाजाने होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यंदा २०२५-२६ या पर्यटन हंगामात १२ आंतरराष्ट्रीय कुझ पर्यटक जहाजे गोव्यात दाखल होणार आहेत. दरम्यान, जानेवारी ते जून २०२६ पर्यंत एम्प्रेस जहाजाच्या १७ फेऱ्या होणार असून यातून २५०० प्रवासी व या जहाजावरील ८५०० कर्मचारिवर्ग मिळून २४ हजारांहून अधिक पर्यटक गोव्यात मुरगाव बंदरात दाखल होणार आहेत.

तर देशांतर्गत जहाजाच्या एकूण २७ फेऱ्या सप्टेंबर २०२५ ते २३ जून २०२६ पर्यंत गोव्यात मुरगाव बंदरात होणार आहे. या संपूर्ण हंगामात या देशांतर्गत जहाजातून ५४ हजार पर्यटक व १३,५०० कर्मचारी मिळून ६७,५०० पर्यटक गोव्यात दाखल होणार आहेत.

दुसऱ्या टप्प्याची सुरुवात १७ रोजी

पर्यटक हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात १७ जानेवारी रोजी क्रिस्टल सिमफोनी या विदेशी पर्यटक जहाजाने होणार आहे. १७ जानेवारी २०२६ रोजी सदर जहाज कोलोंबो मार्गे मुरगाव बंदरात ५५० प्रवासी व ४५० या जहाजावरील कर्मचारी वर्ग मिळून १००० पर्यटकांना घेऊन दाखल होणार आहे.

या जहाजाची दुसरी फेरी १९ जानेवारी रोजी १००० पर्यटकांना घेऊन मुंबई मार्गे गोव्यात मूरगाव बंदरात दाखल होणार आहे.

९ फेब्रुवारी २०२६ रोजी सेलेब्रीटी मिलेनियम हे विदेशी पर्यटक जहाज मुंबई मार्गे गोव्यात २००० हजार पर्यटक व या जहाजावरील ८५० कर्मचारी वर्ग मिळून २८५० पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल होणार आहे.

आयलॅण्ड स्काय पर्यटक जहाज १३ फेब्रुवारी पर्यटकांना घेऊन दाखल होणार आहे. या जहाजाची दुसरी फेरी १८ फेब्रुवारी रोजी मुरगाव बंदरात होणार आहे. ९ मार्च रोजी सेरेना हे विदेशी पर्यटक जहाज न्यू मेंगलोरमार्गे मुरगाव बंदरात दाखल होणार आहे.

१९ एप्रिल रोजी सेवन सीज मरीनर हे विदेशी पर्यटक जहाज न्यू मेंगलोरमार्गे मुरगाव बंदरात ७०० पर्यटक व या जहाजावरील ४४० कर्मचारी वर्ग मिळून ११४० पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल होणार आहे. २४ एप्रिल रोजी क्रिस्टल सेरीनीटी हे विदेशी पर्यटक जहाज कोचिन मार्गे ७४० प्रवासी व ५५० या जहाजावरील कर्मचारी वर्ग मिळून १२९० पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल होणार आहे.

या पर्यटन हंगामातील शेवटचे विदेशी पर्यटक जहाज सेवन सीज नेव्हीगेटर १६ मे रोजी न्यू मेंगलोरमार्गे मुरगाव बंदरात ४९० प्रवासी व ३५० या जहाजावरील कर्मचारी वर्ग मिळवून ८४० पर्यटकांना घेऊन दाखल होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"प्लीज, कोणालाही सांगू नका!", डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाची जाहीर खिल्ली; औषधांच्या किमतीवरुन दिला होता दम

Horoscope: बुद्धी आणि चातुर्याचा विजय! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे राशी भविष्य

Spot Fixing Scandal: क्रिकेट विश्वाला हादरवणारी 'अंडरकव्हर' स्टोरी! स्टॉपवॉच अन् रेकॉर्डिंगनं कसं उद्ध्वस्त केलं खेळाडूंचं करिअर? आकाश चोप्राचा व्हायरल VIDEO चर्चेत

''जर धडा शिकवला नाहीतर पैसे परत..!" सडकछाप भाषेत पाकिस्तानची भारताला धमकी; चिमुकल्यांचा वापर करुन स्पाय नेटवर्क चालवण्याचा ISI चा कट VIDEO

अर्जुन रामपालने गोव्यात मित्रांसोबत पाहिला 'धुरंधर', लुटला खास मेजवानीचा आस्वाद; Photos Viral

SCROLL FOR NEXT