Sameer Amunekar
निळेशार समुद्र, मऊ वाळू आणि आजूबाजूची हिरवळ यामुळे निवती बीच निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहे.
गर्दीपासून दूर असल्याने येथे शांत वातावरण अनुभवायला मिळते; किनारा तुलनेने स्वच्छ आहे.
सकाळचा सूर्यप्रकाश आणि संध्याकाळचा लालसर सूर्यास्त मन मोहून टाकतो.
स्थानिक मच्छीमारांच्या होड्या व त्यांची दैनंदिन कामे कोकणी संस्कृती जवळून दाखवतात.
फोटोग्राफी, व्हिडिओ शूट आणि रिल्ससाठी हा बीच परफेक्ट आहे.
समुद्रकिनाऱ्याजवळ असलेला निवती किल्ला इतिहासप्रेमींना आकर्षित करतो.
कमी खर्चात शांत सुट्टी घालवण्यासाठी निवती बीच उत्तम पर्याय ठरतो.