Goa Cristmas Celebration Dainik Gomantak
गोवा

Goa Cristmas Celebration: नाताळनिमित्त राजधानीत विद्युत रोशणाई, चर्चस्क्वेअर परिसर सजला; राज्यात उत्साहाचे वातावरण

Cristmas 2025: राज्यात नाताळ सणानिमित्त सर्व तयारी झाली असून सर्वत्र अतिशय उत्साहाचे वातावरण आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात नाताळ सणानिमित्त सर्व तयारी झाली असून सर्वत्र अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. राजधानी पणजीतील अनेक भागात नक्षत्र आणि उत्कृष्ट विद्युत रोषणाई करण्यात आली असून पणजीतील चर्च स्क्वेअर परिसरात ख्रिसमस ट्री, सांता, हरणे आदींची आकर्षक देखावे उभारले असून रात्रीच्या वेळी अनेक पर्यटक तसेच स्थानिक येथे येत सेल्फि व फोटो काढत आहेत.

नाताळ सणानिमित्त चर्चस्क्वेअर परिसर आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. पणजी बाजारात नाताळनिमित्त मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी केली जात असून बेबिंका व इतर पारंपरिक गोड पदार्थांना मागणी अधिक आहे. त्यासोबतच केक आणि इतर खाद्यपदार्थांची खरेदीदेखील वाढली आहे.

नाताळनिमित्त विद्युत रोषणाई, गोठा सजावट, नक्षत्र बनविणे आदी कामे संपुष्टात आली असून अतिशय उत्साहाने सर्वत्र सण साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, अनेक संघटनांकडून राज्यस्तरीय गोठा बनविणे, नक्षत्र बनविणे आदी स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज

नववर्षाच्या स्वागतासाठी आता पर्यटक गोव्यात दाखल होत असून किनाऱ्यांवर सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. किनाऱ्यांवर सुरक्षेसंबंधी देखील योग्य ती काळजी घेतली जात असून आवश्‍यक प्रमाणात जीवरक्षकही तैनात करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आगोंद, पाळोळे किनाऱ्यावर बेकायदा कृत्ये, स्थानिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष; नोंदणी नसलेल्या जलक्रीडा

Rohit Sharma Video: "रोहित भाई..वडा पाव खाओगे क्या?" चाहत्याच्या प्रश्नावर 'हिटमॅन'नं दिलं मजेशीर उत्तर, पाहा व्हिडिओ

Goa Municipal Elections: 11 नगरपालिका आणि पणजी महापालिकेसाठी रणधुमाळी! मार्च-एप्रिलमध्ये निवडणुकीचा धमाका

Goa Politics: अमित पालेकरांना 'आप' प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं! "वापरा आणि फेकून द्या" काँग्रेसने लगावला टोला

Margao: विद्युत रोषणाईने मडगाव शहर उजळले, गोमंतकीयांमध्ये नाताळचा उत्साह; बाजारपेठा साहित्याने सजल्या; खरेदीसाठी उडतेय झुंबड

SCROLL FOR NEXT