फोंडा: अंमली पदार्थांचा व्यवहार आता केवळ किनारपट्टी (Goa Beach) भागापुरता मर्यादित न राहता तो शहरांबरोबरच ग्रामीण भागातही पोचला आहे. फोंडा पोलिस (Ponda Police) स्थानकाच्या हद्दीत गेल्या दोन वर्षांत सातपेक्षा जास्त छापे टाकण्यात आले असून त्यातून गांजा व इतर प्रकारचे अंमलीपदार्थ ताब्यात घेण्यात आला आहे. काल सोमवारी उशिरा रात्री बेतोडा - फोंडा भागात गुन्हा अन्वेषण विभागाच्या (Criminal Investigation Department) पोलिसांनी छापा टाकून आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे सहा लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आणि दोघा संशयितांना ताब्यात घेतले. (Latest Goa News updates)
बेतोडा - फोंडा भागातील बगल रस्त्यावर गांजाचा व्यवहार करण्यासाठी दोघेजण येणार असल्याची माहिती पोलिसांना पणजीच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी पाळत ठेवून झारखंड येथील राजेश कुमार सिंग (वय 21) व पश्चिम बंगालमधील दिलीप बाबूलाल सिंग (वय 25) या दोघांनाही ताब्यात घेतले. या दोघांकडे एकूण 6 किलो 10 ग्राम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून दोन पिशव्यात हा गांजा होता. एका पिशवीत 2 किलो 980 ग्राम तर दुसऱ्या पिशवीत 3 किलो 30 ग्राम वजनाचा पानांच्या स्वरुपात गांजा होता. या गांजाची किंमत सहा लाख रुपये असावी असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. ही कारवाई बेतोडा - फोंडा रस्त्यावरील अझिन गॅरेजजवळ करण्यात आली.
ही कारवाई गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दोन्ही संशयितांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक जयराम कुंकळीकर अधिक तपास करीत आहे. दरम्यान, फोंडा तसेच लगतच्या भागात छोटे गाडे तसेच काही वाहनचालकांकडेही गांजा उपलब्ध होत असल्याची वार्ता असून पोलिसांनी शिक्षण संस्था तसेच बसस्थानक भागातील आस्थापनात कसून चौकशी करण्याची मागणी फोंडावासीयांकडून करण्यात येत आहे.
छोट्या गाड्यांवरही मिळतो गांजा!
अंमली पदार्थाचे रॅकेट गोवाभर पसरले असून केवळ किनारपट्टी भागात सीमित असलेला हा अंमली पदार्थाचा व्यवहार आता शहरांबरोबरच ग्रामीण भागातही पोचला आहे. फोंडा ही देवभूमी मानली जात असली तरी या देवभूमीतही गांजा आणि इतर अंमलीपदार्थ सर्रासपणे उपलब्ध होऊ लागला आहे. गेल्या दोन वर्षांत फोंडा भागात सातपेक्षा जास्त छापे टाकण्यात आले आहेत, मात्र बेतोडा येथे मारलेला छापा हा सर्वांत मोठा असून पणजीहून (Panaji) गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांना फोंडा गाठावे लागले आहे. विशेष म्हणजे स्थानिक पोलिसांना याबाबत काहीच कल्पना नव्हती, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.