Goa Crime | Fraud Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोव्यात रिअल इस्टेट प्रकल्पासाठी '1.68' कोटीचा गंड्डा

Goa Crime: गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे कक्षाने 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Fraud: एका रिअल इस्टेट प्रकल्पासाठी 160 कोटी रुपये निधी मिळवून देण्याच्या विविध प्रक्रियेसाठी 1.68 कोटी रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे कक्षाने (ईओसी) 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे संशयित सध्या फरारअसून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती कक्षाचे पोलिस निरीक्षक रझाशद ए. शेख यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार शेख मुख्तार यांना गोव्यात रिअल इस्टेट व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत हवी होती. त्यासाठी त्यांनी संशयितांशी संपर्क साधला. त्यांना गरज असलेली सुमारे 160 कोटी रुपये निधी देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, काही खर्च येईल, असे सांगितले होते.

  • संशयितांनी कट रचून शाम तालरेजा हा बँकेत अधिकारी असून इतर संशयित दलाल असल्याचे तक्रारदारला सांगितले. निधी मिळवण्यासाठी इन्शुरन्स प्रिमियमपोटी 23 सप्टेंबरला 46.54 लाख रुपये घेतले.

  • तसेच रजिस्ट्रेशन शुल्क म्हणून 61.68 लाख रुपये जमा करण्यास सांगितले. ही रक्कम तक्रारदाराने मुलीच्या बँक (Bank) खात्यातून जमा केली.

  • त्यानंतर 160 कोटींचा निधी मंजूर झाला असून इतर बँकेतील प्रक्रियेसाठी आणखी 60 लाख रुपये व कोरे 24 धनादेश घेतले. प्रोसेसिंग शुल्क तसेच करार शुल्क असे मिळून आणखी 45 हजार रुपये घेतले.

यांच्याविरोधात गुन्हा दाखल: वेर्णा येथील मुख्तार इन्फ्रास्ट्रक्चर (इंडिया) प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शेख मुख्तार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी श्‍‍याम अर्जनदास तालरेजा (37), कृष्णन कुमार सिंग ऊर्फ महारा (43), दीपक ठाकूर ऊर्फ दिपक सौदा, हितेश पुरसाननी व रॉकी फर्नांडिस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Santa Cruz Bogus Voters: निवडणूक आयोगाविरोधात गोव्यातही काँग्रेसचा एल्गार! सांताक्रुझ मतदारसंघात 3 हजार बोगस मतदार

Goa Tribal Reservation Bill: आदिवासींसाठी 'सोनियाचा दिनु', राजकीय आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर; अनेक वर्षांच्या लढ्याला यश

Angaraki Sankashti Chaturthi: कर्ज आणि रोगांपासून मुक्ती हवी? जाणून घ्या अंगारकी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Angarki Chaturthi 2025 Wishes In Marathi: बाप्पाला वंदन करा... अंगारकी चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा या शुभेच्छा

Weekly Health Horoscope: 'या' आठवड्यात आरोग्य बिघडण्याची शक्यता! 'या' राशींनी टाळावा ताण आणि चुकीचा आहार

SCROLL FOR NEXT