Goa Crime News | Arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: वेर्णा बिर्ला जंक्शनवर गांजासह बिहारच्या तरुणाला अटक

Goa Crime News: राज्यात गेल्या महिन्याभरापासून पोलिसांनी ड्रग्जविरोधात तीव्र कारवाई सुरु केली आह

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: वेर्णा येथील बिर्ला जंक्शनजवळ क्राईम ब्रँचने मूळ बिहारचा व सध्या कुठ्ठाळी येथे राहत असलेल्या संशयित जीतेंद्र सुदर्शन महातो (33वर्षे) याला ड्रग्जप्रकरणी अटक केली. त्याच्याकडून 310 ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची किंमत सुमारे 35 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

क्राईम ब्रँच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुठ्ठाळी या परिसरात ड्रग्जची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे काल संध्याकाळच्या सुमारास या परिसरामध्ये पोलिस गस्त ठेवण्यात आली होती. बिर्ला जंक्शनजवळ मिळालेल्या वर्णनाशी मिळताजुळता एक तरुण उभा होता.

दरम्यान, त्याच्या हालचालीही संशयास्पद होत्या त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन केलेल्या झडतीत त्याच्याजवळ गांजा सापडला. त्याने तो विक्रीसाठी आणला असल्याचे कबूल केले. त्याच्याविरुद्ध अंमलीपदार्थविषयक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. अधिक चौकशीसाठी त्याला पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

राज्यात गेल्या महिन्याभरापासून पोलिसांनी ड्रग्जविरोधात तीव्र कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत अधिक तर गांजाची विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. गांजा विक्री करणारे हे बहुतेक परप्रांतीय आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT