Vagator Drug Case Dainik Gomantak
गोवा

Vagator Drug Case: वागातोर ड्रग्ज मृत्यू प्रकरणी हणजूण पोलिसांची इंदूरवारी! तपासात सहकार्य न करणाऱ्या मित्रांच्या रक्ताचे घेतले नमुने; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Anjuna Police Indore Investigation: वागातोर ड्रग्‍सप्रकरणी हणजूण पोलिसांनी थेट इंदूर गाठत मृत युवकाच्या सात मित्रांचे रक्तनमुने गोळा केले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: वागातोर ड्रग्‍सप्रकरणी हणजूण पोलिसांनी थेट इंदूर गाठत मृत युवकाच्या सात मित्रांचे रक्तनमुने गोळा केले. तपासात सहकार्य न करणाऱ्या या मित्रांना भारतीय न्याय संहिता कलम ३५(३) अंतर्गत नोटीस बजावून आज (१५ एप्रिल) हणजूण पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वागातोर येथील एका नाईट क्लबमध्ये इंदूरच्या इशान बडगुजर (२१) याचा ड्रग्‍सच्‍या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अज्ञात संशयितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे. एप्रिलच्या सुरुवातीला इंदूरहून मित्रांसह गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या इशानची ४ एप्रिलच्या रात्री पार्टीदरम्यान प्रकृती बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला.

मित्रांच्‍या संशयास्पद वर्तणुकीवर संशय

घटनेच्या वेळी इशानची प्रकृती बिघडल्यानंतर मित्रांनी मदत करण्याऐवजी तेथून पळ काढण्‍याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या हस्तक्षेपानंतरच त्यांनी सहकार्य केले. सध्या त्यांची भूमिका तपासाच्या केंद्रस्थानी आहे.

विलंब झाला तरी पुरावे मिळणार!

रक्तनमुने घेण्यास काहीसा विलंब झाला असला तरी काही अमलीपदार्थांचे अंश शरीरात दीर्घकाळ टिकून राहतात. त्यामुळे या चाचण्यांमधून त्या रात्री नेमके काय घडले, याचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

‘मल्टी-ड्रग्‍स ओव्हरडोस’चा प्रकार

शवविच्छेदन व टॉक्सिकॉलॉजी अहवालातून धक्कादायक बाब समोर आली असून इशानच्या शरीरात ॲम्फेटामाइन, मेथॅम्फेटामाइन, एक्स्टसी, गांजा, बेंझोडायझेपाइन्स आणि अल्कोहोल असे सहा घातक पदार्थ आढळले. हे सर्व पदार्थ अत्याधिक प्रमाणात असल्याने हा ‘मल्टी-ड्रग्‍स ओव्हरडोस’चा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT