Delhi Police Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोवा पोलिसांची धडक कारवाई! आणखी दोन गांजा सप्लायर्सला ठोकल्या बेड्या; गांजा तस्करांची चेन तोडण्याचा प्रयत्न

Goa Police: गांजाप्रकरणी अटकेत असणाऱ्या दोन संशयितांच्या माहितीनुसार, कोलवा पोलिसांनी आणखी दोन गांजा सप्लायर्संना अटक केली.

Manish Jadhav

Goa Crime: राज्यातील वाढत्या अंमली पदार्थ्याच्या विळख्याला आळा घालण्यासाठी गोवा पोलिसांच्या कारवाया वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांत तर पोलिसांनी राज्यातील ठिक-ठिकाणी छापेमारी करुन मोठ्याप्रमाणात अंमली पदार्थ जप्त केला. याचदरम्यान, गांजाप्रकरणी अटकेत असणाऱ्या दोन संशयितांच्या माहितीनुसार, कोलवा पोलिसांनी आणखी दोन गांजा सप्लायर्संना अटक केली. राकेश मेघवाल ( वय वर्ष, 19 उदयपूर) आणि विनायक चौहान (वय वर्ष 27 ओडिशा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची दोघांची नावे आहेत.

गांजा पुरवठ्याची चेन तोडली

दरम्यान, दक्षिण गोवा जिल्हा पोलिसांच्या पथकाने धडक कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्यांसह गांजा पुरवठा करणाऱ्यांना अटक केली. पोलिसांनी ही कारवाई करुन गांजा पुरवठा करणाऱ्यांची चेन तोडण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 डिसेंबर 2024 रोजी कोलव्यातील गांधावली येथे सोनू कुमार चौहान (वय वर्ष 24, उत्तर प्रदेश) याला 2.40 लाखांच्या 2.401 किलो गांजासह अटक केली.

तीन लाखांचा गांजा आणि दोघेजण अटकेत

दुसरीकडे, माडानी-पर्रा येथे शुक्रवारी (31 जानेवारी) म्हापसा पोलिसांनी छापेमारी करुन तब्बल 3 लाखांचा गांजा जप्त केला होता. माडानी-पर्रा येथील बेकायदेशीर गांजा तस्करांची म्हापसा पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी केली. ज्यामध्ये पोलिसांच्या हाती साडेतीन किलो गांजा लागला. या गांजाची बाजारभावानुसार किंमत 3 लाख होते. याशिवाय, या छापेमारीत पोलिसांना दोघांच्या मुसक्या आवळण्यातही यश आले. सुख माझी (वय वर्ष, 21) आणि चंदन सेठी ( वय वर्ष, 23) अशी या संशयितांची नावे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT