Goa Crime: Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: हणजुणेत 1 लाख रूपये किंमतीच्या अमली पदार्थांसह दोघांना अटक

एनडीपीएस अॅक्टनुसार कारवाई

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Crime: हणजुणेतील गोवन स्पाईस रेस्टॉरंटच्या पार्किंग लॉटमध्ये दोघा जणांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडे अमली पदार्थ आढळून आले आहेत. त्याची किंमत सुमारे एक लाख रूपये इतकी आहे.

मंगळवारी २६ डिसेंबर रोजी दुपारी वाजता ही कारवाई करण्यात आली. रायबंदर क्राईम ब्रँचने एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विकास देयकर यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल करून घेतली.

येथे किशोर मंगेश दिवकर (वय 41) याला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा सांकवाडी, हडपडे, बार्देश येथील रहिवासी आहे.

त्याच्याकडे तपकिरी रंगाच्या 10 टॅबलेट्स आढळून आल्या. त्या गोळ्या म्हणजे एक्स्टॅसी टॅबलेट्स हा अमली पदार्थ आहे, असा संशय आहे. त्याचे वजन 4.445 ग्रॅम इतके आहे.

गुरूदास जोतिबा भातकांडे (वय 33) याच्याकडेही अशाच प्रकारच्या एकूण ९ टॅबलेट्स सापडल्या. त्याचे वजन 3.944 ग्रॅम आहे.

तो मूळचा बामणवाड्डो, शिवोली येथील रहिवासी आहे. या दोघांकडे सापडलेल्या एकूण अमली पदार्थांचे एकूण वजन 8.389 ग्रॅम असून त्याची बाजारातील किंमत 1 लाख रूपये होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

Goa News Live: अन्वर शेख हत्या प्रकरण; सर्व संशयितांची निर्दोष सुटका

Cooch Behar Trophy: गोव्याचा युवा संघ सुस्तावला, कुचबिहार क्रिकेट सामन्यात चंडीगड आघाडीच्या दिशेने

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर फसली 'थार'; नागालँडच्या राजधानीतला व्हिडिओ व्हायरल Watch

SCROLL FOR NEXT