Theft Case Dainik Gomantak
गोवा

Goa Theft Case: चोऱ्या थांबणार कधी? आठवडाभरात ऑनलाईन फ्रॉडसह देवालयांतील चोरीच्या अनेक घटना उघड; पोलिसांसमोर आव्हान

Goa Theft Case: गोव्यात चोरीच्या घटनांनी खळबळ; स्थानिकांत भीतीचे वातावरण

Ganeshprasad Gogate

Goa Theft Case: गोव्यात वाढत्या पर्यटन्सोबतच गुन्हेगारीही वाढत असून त्याची झळ स्थानिकांना बसत आहे. सरासरी दर दिवशी एक अपघात, चोरी, दरोडा, विनयभंग अशा गुन्हेगारीच्या घटना राज्यात घडत आहेत.

यामागे स्थानिकांपेक्षा परप्रांतियांचाच हात असल्याचे पोलीस तपासात वारंवार सिद्ध झाले आहे. मागील दोन-तीन दिवसांत चोरी, फ्रॉड अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत.

म्हापसा येथील जागृत देवस्थान आणि राखणदार अशा कीर्तीने प्रसिद्धीस पावलेल्या श्री देव बोडगेश्वर देवस्थानात पहाटेच्या सुमारास चोरीचा प्रकार घडला.

मंदिराच्या प्रांगणात असलेल्या काचेच्या पादुका पेटीमधील जवळपास सहा हजार रुपये लंपास करत चोरट्यांनी देवस्थान समितीसह पोलिसांसमोर खळबळ माजवली होती.

पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे कर्नाटक या दोघा संशयितांना अटक करण्यात आली होती. वाळपई सत्तरी रेडेघाट येथील गणपती मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडून त्यातील रकमेवर डल्ला मारला होता. सदर मंदिरातील cctv मुळे चोरटे पोलिसांच्या हाती लागले.

या प्रकरणानंतर काल शनिवारी काणकोण आगोंदा येथील आगोंदेश्वर मंदिरातही असाच प्रकार घडला असून तांब्या-पितळेच्या भांड्यांसह दानपेटीतील सुमारे लाखभराची रक्कम चोरट्यांनी लंपास केलीय.

देवालयातील फंडपेटी, मोठ्या 2 घंटा, गाभा-याजवळील 2 मोठ्या समया, 2 मध्यम स्वरुपाच्या समया तसेच आरतीचे सामान लंपास केलंय.

काणकोण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच डॉग स्क्वॉड, ठसे तपासणी तज्ञांना पाचारण करण्यात आले, मात्र श्वानपथक शेतात 100 मीटर पर्यंत घुटमळल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. तसेच ठसे तज्ञांकडूनही काहीच खुलासा होत नाहीय.

तसेच काणकोणात शनिवारी बाजाराच्या दिवशी कदंब बसस्थानकाजवळील परिसरात तीन महिलांनी स्थानिक महिलांच्या सोन्याच्या साखळ्या चोरण्याचा प्रयत्न केला. बसमध्ये चढणाऱ्या येडा येथील सुलक्षा वेळीप यांचे मंगळसूत्र हिसकावून नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.

तर ओएनजीसी महामंडळात नोकरी देण्‍याच्‍या बहाण्‍याने गोव्‍यातील शेकडो युवकांना ऑनलाईन प्रक्रियेद्वारे लाखोंचा गंडा घालण्‍याचाही प्रकार गोव्यात झाला असून या ऑनलाईन फ्रॉडची बळी ठरलेल्‍या अनेकांना हजारोंचा गंडा घालण्यात आलाय.

दरम्यान अशा घटनांच्या माध्यमातून गोव्याचे चित्र खराब होत असून पर्यटनासोबतच गोवा हे गुन्हेगारांना आश्रय देणारे राज्य बनतेय की काय असा संशय आता वर्तवला जातोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चेहऱ्यावर थकवा, शब्द अडखळले; दिल्लीत उपचार घेऊन परतलेल्या मंत्री सिक्वेरांनी शांतपणे LOP युरींना दिले उत्तर

IND vs ENG: मोहम्मद सिराजची कमाल! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा ठरला 25वा भारतीय

IND vs ENG: प्रसिद्ध कृष्णा अन् जो रुटमध्ये जोरदार बाचाबाची! मैदानावर घडला हाय व्होल्टेज ड्रामा; अंपायरला करावी लागली मध्यस्थी VIDEO

Mahadevi: वनतारा 'महादेवी'ला परत करण्यास तयार? माहिती देऊन कोल्हापूरच्या खासदाराने 10 मनिटांतच पोस्ट केली Delete

Goa Assembly: टोंका येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची स्थिती बिकट, जेनिफर मोन्सेरात यांनी वेधलं सरकारचं लक्ष; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT