Tenant Steals From Landlady Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: काखेत कळसा, गावाला वळसा; भाडेकरू नोकरानेच मालकिणीला घातला 4.50 लाखांचा गंडा

Tenant Fraud Goa: संशयित आरोपी प्रदीप हा घर मालकिणीच्याच घरात भाड्याच्या खोलीत राहत होता

Akshata Chhatre

कुंडई: मानसवाडा - कुंडई येथे एका धक्कादायक चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्याने घरातील मागच्या दरवाजातून प्रवेश करून अंदाजे ४ लाख ५० हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याने म्हार्दोळ पोलिसांनी या प्रकरणी तपास करत होते. सोमवारी (दि.९) रात्री उशिरा गुन्हा नोंदवला गेला होता आणि आता या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यश आले आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसवाडा - कुंडई येथील या चोरीप्रकरणी प्रदीप बाबुलाल नावैत (वय ३०, रा. मध्यप्रदेश) याला म्हार्दोळ पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, संशयित आरोपी प्रदीप हा घर मालकिणीच्याच घरात भाड्याच्या खोलीत राहत होता. त्यानेच घर मालकिणीच्या घरात चोरी केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

चोरट्याने घरातील मागच्या दरवाजातून प्रवेश करून ही चोरी केली होती, ज्यामुळे सुरुवातीला अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

मात्र, पोलिसांनी तपासचक्र फिरवल्यानंतर प्रदीप बाबुलाल नावैत याच्यावर संशय बळावला आणि त्याला अटक करण्यात आली.

पोलिसांची तत्पर कारवाई

म्हार्दोळ पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती आणि तातडीने तपासाला सुरुवात केली होती. परिसरातील माहिती गोळा करून आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.

म्हार्दोळ पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत, ज्यात चोरलेले दागिने हस्तगत करणे आणि या चोरीमागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध घेणे इत्यादी महत्वाच्या घटकांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjog Gupta: आणखी एक भारतीय पोहोचला ICCमध्ये! संजोग गुप्ता बनले नवे CEO; 2500 उमेदवारांमधून निवड

Jammu Kashmir: 'बॅगेत तिरंगा होता म्हणून अटक केली'; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितला 2013 साली जम्मू काश्मीरमध्ये घडलेला प्रसंग

Viral Video: जबरदस्त धाडस! 16 फूटांचा 'किंग कोब्रा'... पण ती न घाबरता समोरे गेली, 6 मिनिटांत पकडून दाखवलं शौर्य

India Test Team: चाहत्यांचा भ्रम ठरला फोल, 'रोहित-विराट' नसतानाही टीम इंडिया सुस्साट…युवा ब्रिगेड जबरदस्त फाॅर्ममध्ये

Women Health: महिलांनो, तुमच्या पोटाचे विकार हलक्यात घेऊ नका! असू शकते 'या' गंभीर आजाराची सुरुवात

SCROLL FOR NEXT