India vs Pakistan: सुरुवातच डगमगली! अभिषेक शर्मा पुन्हा शून्यावर बाद; सलमान अली आगाच्या गोलंदाजीवर फसला VIDEO

Abhishek Sharma Out for Duck: टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित हायहोल्टेज सामन्यात भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला.
Abhishek Sharma Out for Duck
Abhishek Sharma OutDainik Gomantak
Published on
Updated on

Abhishek Sharma Out for Duck: टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित हायहोल्टेज सामन्यात टीम इंडियाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या या सामन्यात टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. सामन्याच्या पहिल्याच षटकात अशा प्रकारे महत्त्वाची विकेट गमावल्याने भारतीय गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून टीम इंडिया सुरुवातीलाच काहीशी अडचणीत सापडली आहे.

विशेष म्हणजे, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने स्वतः गोलंदाजीची धुरा सांभाळत पहिल्याच षटकात भारताला हा मोठा झटका दिला. डावाच्या पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर अभिषेक शर्माने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नीट झाला नाही. सलमान अली आगाने टाकलेल्या चेंडूवर अभिषेकने दिलेल्या झेलमुळे पाकिस्तानच्या संघात आनंदाचे भरते आले. ज्या फलंदाजाकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती, तोच सलामीवीर खातेही न उघडता बाद झाल्याने भारतावर आता उर्वरित फलंदाजांकडून चांगली भागीदारी उभारण्याचे मोठे दडपण आले आहे.

Abhishek Sharma Out for Duck
India vs Pakistan: 'अल्ला पाऊस पाड, 1 गुण मिळेल', पाकिस्तानी खेळाडूची देवाकडे प्रार्थना! मैदानात भिडण्यापूर्वीच पाकड्यांनी मानली हार

या सामन्यात अभिषेक शर्माची विकेट ही टर्निंग पॉईंट ठरु शकते, कारण टी-20 फॉरमॅटमध्ये अभिषेक त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात त्याचा फॉर्म फसला. सलामीची जोडी लवकर फुटल्याने आता मधल्या फळीतील फलंदाजांना मैदानात टिकून राहावे लागणार आहे. पाकिस्तानच्या संघाने या विकेटसह सामन्यावर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला असून, आता भारतीय फलंदाज या दबावातून सावरत धावसंख्येचा वेग कसा वाढवतात, याकडे सर्व चाहत्यांचे डोळे लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com