Car Stunt On Road Dainik Gomantak
गोवा

Car Stunt on Porvorim Road: नेमकं चाललंय काय? कारचे दरवाजे उघडेच ठेऊन महामार्गावर स्टंटबाजी; व्हिडिओ व्हायरल

पर्वरी येथील मॉल दे गोवा या मॉलच्या समोरील महामार्गावर हा प्रकार घडला असून मागून येणाऱ्या गाडीतील एकाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.

दैनिक गोमन्तक

Car Stunt on Porvorim Road: वाहनचालकांचा मुजोरीपणा, बेदरकारपणे गाडी चालवणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे या सर्व गोष्टींमुळे गोव्यातील अपघात थांबण्याचे नाव घेत नाहीत.

स्थानिक तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांकडूनही या गोष्टी सातत्याने घडत असतात. काल रात्रीही अशीच एक घटना घडली आहे ज्यामध्ये एक कार सर्व दरवाजे उघडे ठेऊन मार्गावरून जात होती. याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

इथे पहा व्हायरल व्हिडिओ :

पर्वरी येथील मॉल दे गोवा या मॉलच्या समोरील महामार्गावर हा प्रकार घडला असून मागून येणाऱ्या गाडीतील एकाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. यामध्ये एक कार गाडीचे सर्व दरवाजे उघडे ठेऊन स्टंट करत असल्याचे दिसत आहे.

GA 03C 9203 असा त्या गाडीचा क्रमांक असून यामध्ये वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. आजूबाजूच्या वाहनचालकांनी या प्रकाराबद्दल रोष व्यक्त केला असून त्वरित यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, पोलीस या प्रकारात अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT