Porvorim crime news Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पर्वरीमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग! स्कूल व्हॅन चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; 'POCSO' अंतर्गत गुन्हा दाखल

Porvorim Molestation Case: संशयित आरोपी मागील काही काळापासून या चिमुकलीला शाळेत सोडण्यासाठी आणि परत आणण्यासाठी व्हॅन चालवत होता

Akshata Chhatre

child molestation case Goa: पर्वरी येथील सुकूर परिसरातील '२० पॉइंट' भागात एका ६ वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी ४७ वर्षीय स्कूल व्हॅन चालक अल्लाबक्ष सय्यदबडे याला अटक केली आहे. संशयित आरोपी हा एका खाजगी 'इको' स्कूल व्हॅनवर चालक म्हणून काम करत होता आणि संबंधित बालिकेला घरातून शाळेत नेण्या-आणण्याचे काम करायचा.

व्हॅन चालकाचा विश्वासघात

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अल्लाबक्ष हा मागील काही काळापासून या चिमुकलीला शाळेत सोडण्यासाठी आणि परत आणण्यासाठी व्हॅन चालवत होता. मात्र, ज्या विश्वासाने पालकांनी आपल्या मुलीला त्याच्याकडे सोपवले होते, त्याच विश्वासाला तडा देत त्याने चिमुकलीचा विनयभंग केला. पीडित मुलीने दिलेल्या माहितीनंतर पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली.

गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

पर्वरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक १०१/२०२५ नोंदवला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) आणि 'पोक्सो' (POCSO) कायद्यातील अत्यंत कठोर कलमे लावली आहेत; BNS कलमे: ६४, ७४, ३५१ आणि ११५(२), POCSO कलमे: ८(१) आणि ८(२) (मुलांवरील लैंगिक अत्याचार आणि विनयभंग) याअंतर्गत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पर्वरी पोलीस निरीक्षक प्रतोती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील बेपत्ता अल्पवयीन मुलगी दिल्लीत सापडली, वास्को पोलिसांची धडक कारवाई; तांत्रिक तपासाच्या जोरावर सुखरुप सुटका

हाय-टेक फीचर्स, दमदार परफॉर्मन्स... 'किआ सेल्टोस'चं नवं मॉडेल जानेवारीला होणार लाँच; क्रेटाचं टेन्शन वाढणार

Virat Kohli: कोहलीचा 'विराट' शो फक्त टीव्हीवरच, स्टेडियममध्ये चाहत्यांना नो-एन्ट्री; 'विजय हजारे ट्रॉफी'बाबत सरकारचा मोठा निर्णय

Goa Crime: भुतेभाटमध्ये चोरीचा थरार! 5 जणांच्या टोळीचा डल्ला मारण्याचा 'प्लॅन' फसला; एकाला रंगेहात पकडलं, 4 जण पसार

Goa ZP Election: "युतीचा निर्णय झाला पण..." सरदेसाईंनी मांडली पराभवाची कारणे; '2027'साठी नव्या रणनीतीचे संकेत

SCROLL FOR NEXT