Illegal Conversion Case Dainik Gomantak
गोवा

महत्वाची घडामोड! बेकायदेशीर धर्मांतरण प्रकरणी डॉम्निक डिसोझाच्या पोलीस कोठडीत वाढ

Illegal Conversion Case: 'God Bless Government' अशी खोचक प्रतिक्रिया देत त्याने अधिक बोलणे टाळले

Ganeshprasad Gogate

Illegal conversion case in Goa : बेकायदेशीर धर्मांतरण प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या पास्टर डॉम्निक डिसोझाच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

तसेच या प्रकरणात डॉम्निकला एका दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. म्हापसाच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने हा निवाडा दिला आहे.

तीन दिवसांपूर्वी बेकायदेशीर धर्मांतरणप्रकरणी ‘बिलिव्हर्स’चे पास्टर डॉम्निक डिसोझा याला म्हापसा पोलिसांनी अटक केली होती. मागील दोन दिवसापासून डिसोझा पोलीस कोठडीत होता. त्यात आता अजून एका दिवसाची वाढ झाली आहे

फोंडा येथील एका इसमाचे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याप्रकरणी तसेच काळ्या जादूच्या आरोपाखाली डॉम्निक याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच त्यांत त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याच्यावर वैद्यकीय उपचार देखील करण्यात आले होते.

आता डॉम्निक डिसोझाच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोर्टातून त्याला पोलीस स्टेशनला नेतेवेळी पत्रकारांनी त्याची प्रतिकिया विचारल्यावर त्याने 'God Bless Government' अशी खोचक प्रतिक्रिया दिली. तसेच प्रकृतीबद्दलही विचारणा केल्यावर 'Go and find out in hospital' असे सांगत प्रकृतीविषयी अधिक सांगणे त्याने टाळले.

‘बिलिव्हर्स’च्या सडये, शिवोलीमधील फाईव्ह पिलर चर्चचे पास्टर डॉम्निक डिसोझा व त्याची पत्नी जोन मस्करेन्हास यांच्यावर याधीही गुन्हा नोंदवण्यात आला होता. पास्टर डॉम्निक याच्या विरोधात हा तिसरा गुन्हा नोंद झालेला आहे.

हे प्रकार वारंवार घडत असल्याने डॉम्निक याला गोव्यातून तडीपार करावे, तसेच गोव्यात धर्मांतरविरोधी कायदा करावा, अशी मागणी काही दिवसांपूर्वी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT