Land Grabbing Case Canva
गोवा

Land Grabbing Case: आणखी चार भूखंड मालमत्ता हडप केल्या! सिद्दिकीची कबुली; गोव्यासह दिल्ली, पुणे, हैदराबादेत मिळून 15 गुन्हे

Illegally Grabbing Property: एसआयटीकडे नोंद असलेल्या गुन्ह्यांव्यतिरिक्त आणखी ४ भूखंड मालमत्ता बेकायदेशीरपणे हडप केल्याची कबुली दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: जमीन हडप प्रकरणातील अट्टल गुन्हेगार सिद्दिकी ऊर्फ सुलेमान महम्मद खान याच्याविरुद्ध एसआयटीकडे नोंद असलेल्या गुन्ह्यांव्यतिरिक्त आणखी ४ भूखंड मालमत्ता बेकायदेशीरपणे हडप केल्याची कबुली दिली आहे.

त्याचे संबंध असलेल्या ३५ तरुणींपैकी काही तरुणींच्या बँक खात्यामधून १.३६ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्याच्याविरुद्ध गोव्यातील सात गुन्ह्यांसह दिल्ली, पुणे व हैद्राबाद येथे मिळून १५ गुन्हे नोंद आहेत, अशी माहिती क्राईम ब्रँच पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली. संशयित सुलेमान याच्याविरुद्ध म्हापसा व वाळपई येथील ५ जमीन हडप प्रकरणाचा तपास सुरू आहे. हणजूण येथील खुनाचा गुन्हा त्याच्याविरुद्ध नोंद आहे.

म्हापसा येथील वकिलावर खुनी हल्ला केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल आहे. या दोन्ही गुन्ह्यामध्ये त्याला फरारी घोषित करण्यात आले होते. २०२० पासून तो फरारी होता. त्याने गोव्यात काही जमीन मालमत्तेचे खोटे दस्तावेज तयार भूखंड विकल्याची माहिती एसआयटीने केलेल्या चौकशीतून उघड झालेली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गोवा पोलिसांची एसआयटी पथक त्याच्या मागावर होते. अखेर त्याला कर्नाटकातून अटक करण्यात यश आले, अशी माहिती क्राईम ब्रँचचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

भूखंड खरेदी केलेल्यांच्याही जबान्या घेणार

अटक केलेला आरोपी सुलेमान सिद्दीकी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर गोव्यात ७, दिल्लीत १, हैदराबादमध्ये ३ आणि पुण्यात ३ गुन्हे दाखल आहेत. त्याने विविध गुन्हे करण्यासाठी पत्नी वगळता ३५ मध्यवर्गीय तरुणींची मदत घेतली होती. त्यांच्या बँक खात्याचा तसेच एटीएमचा तो पैशांचा व्यवहार करण्यासाठी वापर करत होता.

तो या तरुणींशी मैत्री व संबंध ठेवत होता. त्यामध्ये दिल्ली, पुणे, गोवा तसेच हैद्राबाद येथील तरुणींचा समावेश असून त्यातील सध्या त्याने चार तरुणींची नावे उघड केली आहेत. या तरुणींना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. त्याने ज्यांना भूखंड मालमत्ता विकल्या आहेत, त्यांच्याही जबान्या नोंदवण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

Goa: सभागृहावर पडले झाड, 2 वाहनांचे नुकसान; पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Goa Live News: 29 जुलैपर्यंत गोव्यात पावसाचा यलो अलर्ट

Goa Film Festival: गोवा चित्रपट महोत्सव कोणासाठी? की फक्त औपचारिक सोहळ्यांचे आयोजन..

SCROLL FOR NEXT