Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa Illegal Land Grabbing Case: एसआयटी सध्या राज्यातील अशा 41 प्रकरणांचा तपास करत आहे, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
ED | Land Grabbing Case
ED | Land Grabbing CaseDainik Gomantak

Goa Illegal Land Grabbing Case

बेकायदा जमीन बळकावल्याप्रकरणी 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंग खटल्याविषयी विशेष न्यायालयाने 13 मे रोजी फिर्यादी तक्रारीची दखल घेतली आहे.

अंमलबजावणी संचालनालय (ED), पणजी विभागीय कार्यालयाने 12 एप्रिल रोजी विशेष न्यायालय (पीएमएलए), म्हापसा यांच्यासमोर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2020 अंतर्गत एका मनी लाँडरिंग प्रकरणी फिर्यादी तक्रार दाखल केली आहे. याबाबत विविध एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे.

गोव्यातील बेकायदा जमीन बळकावल्याप्रकरणी विविध पोलिस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीवरुन ईडीने तपास सुरु केला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गोवा पोलिसांच्या वतीने विशेष तपास टीम (एसआयटी) तयार करण्यात आलीय. एसआयटी सध्या राज्यातील अशा 41 प्रकरणांचा तपास करत आहे, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ED | Land Grabbing Case
Ponda News : दारूच्या नशेत पर्यटकांची दादागिरी; दाभाळ येथील प्रकार

संशयितांनी बनावट कागदपत्रे तयार करुन संबधित जमीन मालकांची फसवणूक केल्याचे तपासातून समोर आले आहे. तसेच, यातील काही बेकायदा जमीनिची विक्री करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

ईडीने २३ नोव्हेंबर २०२३ मध्ये ५३५ कोटी रुपयांच्या अशा मालमत्ता जप्त केल्या होत्या. दरम्यान, बेकायदेशीरपणे जमीन बळकावल्याप्रकरणी यापूर्वी ईडीने राजकुमार मैथी आणि विक्रांत शेट्टी यांना अटक केली, दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु असल्याची माहिती ईडीने दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com