crime news Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: साळगावात ड्रग्सप्रकरणाचा पर्दाफाश!! मध्य प्रदेशातील आरोपीकडून 2.5 लाखांचा गांजा जप्त

Goa Crime News: साळगाव येथील कॅथोलिक स्मशानभूमीजवळ केलेल्या एका गुप्त कारवाईत मध्य प्रदेशातील एका ३६ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आलीये

Akshata Chhatre

म्हापसा: गोवा पोलिसांनी केलेल्या एका गुप्त कारवाईत त्यांच्या हाती २.५३३ किलो ग्रॅम गांजा सापडला आहे. साळगाव येथील कॅथोलिक स्मशानभूमीजवळ केलेल्या एका गुप्त कारवाईत मध्य प्रदेशातील एका ३६ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आलीये. या व्यक्तीकडून मोठी प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे, ज्याची किंमत २.५ लाख रुपये आहे. राजाराम सीताराम बनवासी असे या व्यक्तीचे नाव असून गोवा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली.

साळगाव येथे पोलिसांनी ड्रग्स विरोधी कारवाई अंतर्गत छापा टाकून अडीच लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. याप्रकरणी संशयित राजाराम सीताराम बनवासी (३६, मध्यप्रदेश) नावाच्या इसमाला गोवा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

शुक्रवार (दि.२२) रोजी पहाटेच्या सुमारास साळगाव पोलिसांनी साळगाव सिमित्रीकडे ही कारवाई केली. बनवासीने हा गांजा ग्राहकाला देण्यासाठी आला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

सिमित्रीकडे ड्रग्सचा विक्री व्यवहार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत घटनास्थळी संशयित येताच त्यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, संशयित बनवासी याच्याकडे २.५३३ किलो ग्रॅम गांजा सापडला. या गांजाची किंमत २ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. हा ड्रग्स जप्त करून पोलिसांनी संशयित आरोपीला अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदवून अटक केली. पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक यांच्या मार्गदर्शनाखाली साळगाव पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT