Raid on gambling den in Colva Dainik Gomantak
गोवा

कोलव्यात जुगार अड्ड्यावर छापा; गुजरातमधील आठ जणांना अटक

गोव्यात येणारे पर्यटन हॉटेल तसेच मांडवी नदीतील तरंगत्या कसिनोवर जाण्यासाठी आतुरलेले असतात.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात (Goa) पर्यटकांकडून (Tourist) जुगार अड्‍ड्यांना ऊत आला असून सेर्नाभाटी - कोलवा येथील बेवॉच रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे अन्वेषण विभाग क्राईम ब्रँचच्या पथकाने रात्री उशिरा छापा टाकला. या छाप्यात 2 लाख 10 हजार रोख रक्कम तसेच जुगार चिप्स अथवा कॉईन्स तसेच जुगाराचे इतर साहित्य किंमत 48.10 लाख मिळून सुमारे 50.20 लाखांचा ऐवज जप्त केला. या जुगारप्रकरणी रिसॉर्ट जुगार खेळण्यास आलेल्या गुजरातमधील आठ जणांना अटक करून सुटका करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

गुन्हे अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने राज्यात सुरू असलेल्या कसिनो जुगाराच्या सुळसुळाटाविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसात दक्षिण गोव्यातील रिसॉर्टवर छापे टाकून कसिनो जुगार चालकांची झोप उडविली आहे. कोविड - 19 मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात कायदेशीर कसिनो जुगारालाही बंदी आहे. तरंगते कसिनो सध्या बंद आहेत, मात्र हॉटेल्स तसेच रिसॉर्टमध्ये कसिनो

जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली. कारवाई केलेल्या पथकामध्ये पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत, निरीक्षक अनंत गावकर, निरीक्षक मंगेश वळवईकर यांच्यासह इतर पोलिसांचा समावेश होता.

दरम्यान, हल्लीच दोन दिवसांपूर्वी क्राईम ब्रँचने मडगाव येथील एका इमारतीच्या बद खोलीत बेकायदेशीर सुरू असलेल्या कसिनोवर छापा टाकला होता व 12 जणांना अटक केली होती तर तेथील 10 कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यापासून राज्यात तरंगते तसेच हॉटेलातील कसिनो बंद आहेत. ते सुरू करण्यासाठी कसिनो चालकांनी सरकारला विनंती करूनही त्याला परवानगी देण्यात आलेली नाही.

कोविड ‘एसओपी’नुसार बंदी

गोव्यात पर्यटन मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत. हॉटेल तसेच मांडवी नदीतील तरंगते कसिनोवर जाण्यासाठी पर्यटक आतुरलेले असतात. सध्या हे कसिनो बंद असल्याने तरुण पर्यटक जुगारासाठी हॉटेलमध्ये जात आहेत. परवाना असलेल्या कसिनो जुगारांना सध्या कोविड - 19 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार बंदी आहे.

जुगार खेळणारे गुजरातमधील

रिसॉर्टवर जुगार अड्ड्यावर छापा टाकला त्यावेळी अटक केलेले तरुण हे गुजरातमधील व ते सर्वजण 25 ते 33 वयोगटातील आहेत. हे सर्वजण तीन पत्ती तसेच अंदर बाहर पत्त्यांचा जुगार खेळत होते. टेबलावर जुगाराच्या चिप्त व कॉईन्स होते. त्याशिवाय त्यांच्याकडे रोख रक्कमही होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Firing Case: जैतीर-उगवेत रेती उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार, स्थानिक बंदूकधारकांची पोलिसांकडून चाैकशी, 50 मजुरांची झडती

Goa Rain: ऐन ऑक्टोबरमध्ये राज्य 'ओलेचिंब'! महिन्यात आतापर्यंत 11.82 इंच नोंद; अनेक ठिकाणी पडझड, रस्त्यांवर पाणी

Danish Chikna Arrested: 'चिकना'चा खेळ संपला! अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खास माणसाला गोव्यातून उचललं, पत्नीलाही ताब्यात घेतलं

Horoscope: मेहनतीला योग्य फळ मिळेल, भावनिक स्थैर्य राखा; आर्थिक स्थिती मजबूत

Anjuna Cocaine Case: हणजूण कोकेन तस्करी प्रकरणी कॅमेरोनियन नागरिकाला 6 दिवसांची पोलीस कोठडी!

SCROLL FOR NEXT