smugglers arrested goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोवा पोलिसांनी कर्नाटकात अडवली सांगलीची गाडी, तिघा तस्करांकडून 1.6 कोटी जप्त; बेळगाव आयकर विभागाकडून पुढील तपास सुरु

Goa Crime News: गोव्यातून होणाऱ्या तस्करीचा माग काढत केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या गोवा विभागाने कर्नाटकात कारवाई केली आहे

Akshata Chhatre

पणजी: गोव्यातून होणाऱ्या तस्करीचा माग काढत केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या गोवा विभागाने कर्नाटकात कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तिघांकडून १.६ कोटी रुपये जप्त केले आहेत. पोलिसांनी आयकर विभागाला ही रक्कम सोपवली असून, सध्या बेळगाव आयकर विभागाकडून याची पुढील तपास सुरु आहे.

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार दुबई किंवा इतर परराष्ट्रांमधून सोन्याची तस्करी सुरु होती. या तस्करीसाठी गोव्याप्रमाणे इतर विमानतळाचा वापर केला जायचा. या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुप्तहेरांकडून माहिती मिळवली आणि गोवा, कर्नाटक तसेच महाराष्ट्रतील काही संशयितांना अटक करण्यात आली आहे.

हिरेबागवाडी टोलाजवळ पोलिसांनी सांगली महाराष्ट्र येथील एका गाडीची झडती घेतली असता त्यांच्या हाती १.६ कोटी रुपये लागले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुर ही माणसं तस्करी केलेलं सोनं ने-आण करण्याचे काम करायची.

संशयितांना सोने दिलेच नाही..

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सोन्याचे भाव वाढल्याने तस्करांनी संशयित आरोपींना सोनं दिलंच नाही आणि हीच रक्कम घेऊन परत येत असताना पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले. डीआरआयने केलेल्या तपासात महाराष्ट्रातही काही सोनार यात सामील असण्याची शक्यता आहे. हे सोनार परदेशातून सोनं विकत आणतात अशी माहिती मिळाल्याने सध्या पोलीस यावर नजर ठेऊन आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT