arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 13 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; व्हडलेभाट-ताळगावातील धक्कादायक घटना

Goa Police: 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्याच घरात कोंडून ठेवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी केवणे-दोनापावल येथील हनुमंत बगप्पा तलवार (38) याला पणजी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Manish Jadhav

पणजी: गोव्यात गेल्या काही दिवसांत सातत्याने अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यातच आता, व्हडलेभाट-ताळगाव येथून अशीच एक घटना समोर आली आहे. येथे एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्याच घरात कोंडून ठेवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी केवणे-दोनापावल येथील हनुमंत बगप्पा तलवार (38) याला पणजी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पोलिस कारवाई

दरम्यान, पोलिसांनी आरोपी (Accused) हणुमंतविरुद्ध बीएनएस कायद्याच्या कलम 126(2), 127(2), 75(2), 75(3), 76 आणि 79 खाली तसेच गोवा बाल कायद्याच्या कलम 8 तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 8 आणि 12 खाली गुन्हा नोंद केल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली. मुलीच्या कुटुंबियांनी पणजी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत संशयित हनुमंत तलवार हा घरी कोणी नसताना आला होता. तेव्हा त्यांची अल्पवयीन मुलगी एकटीच घरी होती. त्याने याच संधीचा फायदा उठवला.

फेरीबोट कर्मचाऱ्याला अटक

काही दिवसांपूर्वीच, ओल्ड गोवा पोलिसांनी एका फेरीबोट कर्मचाऱ्याला 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तसेच तिच्यावर मोबाईल नंबर देण्यासाठी जबरदस्ती केल्याप्रकरणी अटक केली होती. पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार सुदेश नावाचा एका फेरीबोट कर्मचारी पीडितेचा पाठलाग करत होता आणि तिला मोबाईल नंबर देण्याची जबरदस्ती करत होता. पीडिता फेरीबोटीने जात असताना त्याने मुलीचा हात पकडला, तसेच तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. गवंडाळी फेरीमधून पीडिता परत येत असताना सुदेशने पुन्हा तिचा पाठलाग करत तिच्यावर मोबाईल नंबर देण्यासाठी जबरदस्ती केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT