Valpoi Police Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी स्फोटके साठवणाऱ्याला अटक; वाळपई पोलिसांची कारवाई

Valpoi Police: गेल्या काही दिवसांत वाळपई परिसरात वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

Manish Jadhav

Goa Crime: गेल्या काही दिवसांत वाळपई परिसरात वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. यातच, सोमवारी (10 फेब्रुवारी) वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी स्फोटके साठवल्याबद्दल एकाच्या मुसक्या आवळण्यात वाळपई पोलिसांना यश आले. झाकीर हुसेन (रा. हातवाडा-वाळपई) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

नेमकं प्रकरण काय?

डीचोलीचे विभागीय पोलीस अधिकारी (SDPO) जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना माहिती मिळाली की, झाकीरने वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी स्फोटक पदार्थ साठवून ठेवले आहेत. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी एक पथक तयार केले. हे पथक झडती वॉरंट घेऊन फॉरेन्सिक लॅबोरेटरी स्टाफ आणि बाँब निकामी पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी झाकीरकडून गावठी बॉम्ब, कोयता आणि सुरी जप्त केली. झाकीरला स्फोटकांबद्दल विचारले असता त्याने खुलासा केला की, त्याने वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी ही स्फोटके साठवून ठेवली होती.

वाळपई पोलिसांची कारवाई

दरम्यान, ही कारवाई पोलीस निरीक्षक (PI) विदीश शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांना PSI प्रतिमेश गवस, पोलीस शिपाई (PC) 6636 गोव्रेश नाईक आणि पोलीस शिपाई (PC) 6586 प्रशांत सुतार यांनी सहाय्य केले. पुढील तपास वाळपई पोलीस निरिक्षक विदीश शिरोडकर, डिचोलीचे SDPO जीवबा दळवी आणि उत्तर गोवा पोलीस अधीक्षक (SP North) अक्षत कौशल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT