Margao Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Margao Municipal Council: धक्कादायक! मडगाव पालिकेतील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग, एकाला अटक

मागील काही महिन्यांच्या कालावधीत राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Kavya Powar

मागील काही महिन्यांच्या कालावधीत राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मडगाव पालिका इमारतीत शिरलेल्‍या एका इसमाने पालिकेतील एका महिला कर्मचाऱ्यासमोर विक्षिप्‍त हावभाव करून तिचा विनयभंग केल्‍याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आरोपाखाली मडगाव पोलिसांनी काल (11 जानेवारी) एकाला ताब्‍यात घेतले.

फकिरासारखा वेष केलेली ही व्‍यक्‍ती काल दुपारी 2.10 च्‍या सुमारास पालिका इमारतीत घुसली. पालिकेच्‍या पहिल्‍या मजल्‍यावर येऊन तो इकडे तिकडे फिरत असताना कर्मचाऱ्यांनी त्‍याला हटकले असता त्‍यांना विक्षिप्‍त रितीने हावभाव करून तिथून त्‍याने पळ काढला.

या संदर्भात मडगाव पाेलिसांना कळविल्‍यानंतर त्‍यांनी त्‍याचा शोध घेऊन मडगाव रेल्‍वे स्‍थानकावर त्‍याला जेरबंद केले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कुळे रेल्वेस्थानकाजवळ मध्य प्रदेशमधील 2 मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. गोव्यात कामासाठी म्हणून आलेल्या 2 अल्पवयीन मुलींवर कुळे रेल्वे स्थानकावर कामाला असलेल्या तिघांनी अत्याचार केला. कुळे पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT