Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Goa Cricket Betting: गोव्यातील वाडे परिसरातील एका श्रीमंत वस्ती असलेल्या कॉलनीत शुक्रवारी मध्यरात्री रायबंदर सायबर क्राईम पोलिसांनी मोठी कारवाई करत क्रिकेट सट्टा प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले.

Sameer Amunekar

वास्को : गोव्यातील वाडे परिसरातील एका श्रीमंत वस्ती असलेल्या कॉलनीत शुक्रवारी मध्यरात्री रायबंदर सायबर क्राईम पोलिसांनी मोठी कारवाई करत क्रिकेट सट्टा प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात उपनिरीक्षक नवीन नाईक, मंदार देसाई आणि इतर पोलिसांचा समावेश होता.

छाप्यात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची ओळख पटली असून त्यामध्ये बिहारमधील तिघांचा समावेश आहे. यात रवींद्र कुमार शर्मा हा सुपल जिल्ह्यातील बासखोरा गावचा रहिवासी आहे, तर सुनील कुमार हा सुपल जिल्ह्यातील सरोजाबेला येथील आहे. तिसरा आरोपी बिरेंद्र कुमार मोंडाल हा मधुबनी जिल्ह्यातील बासीपट्टी गावचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर सट्टा व्यवहारासाठी वापरलेले साहित्य जप्त केले आहे. यात ११ मोबाईल फोन, सीम कार्ड्स, १ लॅपटॉप, २ ऑडिओ मिक्सर, बेकायदेशीर टेलिकम्युनिकेशन युनिट्स आणि अन्य उपकरणांचा समावेश आहे.

या सर्व साहित्याची तपासणी सुरू असून, आरोपींनी कोणत्या माध्यमातून सट्टा व्यवहार केला आणि त्यामागील मोठे रॅकेट आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT