Crime News  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: पेडे-बाणावली खून प्रकरण: पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी मंगला सिधनलला अटक

Goa Crime News: गोव्यात गुन्हेगारीच्या घटनांचे प्रमाण वाढले असून खून, दरोडा, हाणामारी अशा घटना दैनंदिन घडू लागल्याने गोवेकरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.

Ganeshprasad Gogate

Goa Crime News: पेडे बाणावली येथील विश्वनाथ सिधनल याच्या खून प्रकरणी एक महत्वाची अपडेट हाती येतेय. या खून प्रकरणी वैष्णवी उर्फ मंगला सिधनल हिला कोलवा पोलिसांनी अटक केली आहे.

या खून प्रकरणात आणखी काहीजण सहभागी असल्याची माहिती समोर येतेय. पेडा-बाणावली येथे पत्‍नीसोबत भाड्याच्‍या खोलीत राहणाऱ्या विश्‍वनाथ सिदनाळ (वय 35 वर्षे) या मूळ लोंढा-कर्नाटक येथील युवकावर अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने हल्‍ला करून खून केल्‍याची धक्कादायक घटना काल मंगळवारी 26 मार्चला उघडकीस आली होती.

याघटनेमागे अनैतिक संबंध हे कारण असावे, असा प्राथमिक निष्‍कर्ष व्यक्त करण्‍यात येत असून याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातावर खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.

दरम्यान मंगळवारी दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी विश्‍वनाथच्या पत्नीची म्हणजेच मंगला हिची चौकशी केली असून आज 27 मार्चला कोलवा पोलिसांनी मंगला सिधनलला अटक केली आहे.

गोव्यात गुन्हेगारीच्या घटनांचे प्रमाण वाढले असून खून, दरोडा, हाणामारी अशा घटना दैनंदिन घडू लागल्याने गोवेकरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.

धक्कादायक म्हणजे घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये परप्रांतीयांचा सहभाग असल्याचे उघड होत आहे.

काही दिवसांपूर्वी सूचना सेठ या महिलेने आपल्या तान्हया बाळाचा गोव्यात येऊन खून केल्यानंतर गोवा हे गुन्हेगारीचे आश्रय स्थान बनतेय काय असा सवाल तयार झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT