Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: बेकायदा रिव्हॉल्वर बाळगल्याप्रकरणी तिघे अटकेत, एकजण फरार; रामनगर, कुळे पोलिसांची संयुक्त कारवाई

Goa Crime: गोव्याहून कर्नाटक मार्गे एसटी बसने प्रवास करणाऱ्या जोधपूर (राजस्थान) येथील चौघांपैकी बेकायदेशीररित्या रिव्हॉल्वर बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेण्यात आले.

Manish Jadhav

Goa Crime: गोव्याहून कर्नाटक मार्गे एसटी बसने प्रवास करणाऱ्या जोधपूर (राजस्थान) येथील चौघांपैकी बेकायदेशीररित्या रिव्हॉल्वर बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेण्यात आले तर अन्य दोघे पळून गेले. रामनगर पोलिसांनी याची माहिती मोले येथे चेक नाक्यावर दिली. कुळे पोलिसांनी लगेच नाकाबंदी केली, तेव्हा पळून गेलेल्यांपैकी एकाला मोले येथे गोव्यात येणाऱ्या एसटी बसमधून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले तर एकजण फरार आहे. त्यामुळे चर्चेला उत आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यातून चार राजस्थानी युवक कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बसने प्रवास करत होते. मोले चेक नाक्यावरुन एसटी बस गेली तेव्हा कुणीही त्यांची बॅग तपासलेली नव्हती. अनमोड येथे जेव्हा एसटी बस पोहोचली, तेव्हा अबकारी खात्याचे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांची बारकाईने तपासणी सुरु केली, तेव्हा या चौघांपैकी एकाची बॅग तपासली असता, त्यात रिव्हॉल्वर दिसली.

त्यांनी तात्काळ याची माहिती तिथे बंदोबस्तासाठी असलेल्या रामनगर पोलिसांना दिली. पोलिस त्या ठिकाणी आले असता त्या चारपैकी दोघांनी पळ काढला तर दोघांची झडती घेतली असता दोन रिव्हॉल्वर व आठ जिवंत (बुलेट)गोळ्या सापडल्या. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

गोव्याच्या दिशेने अन्य दोघे पळाले असण्याची शक्यता गृहित धरुन कुळे पोलिसांना याची माहिती देण्यात आली. कुळे पोलिसांनी लगेच मोले चेक नाक्यावर कडक पहारा ठेवून कर्नाटकमधून येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी चालू केली. कर्नाटकमधून आलेल्या एसटी बस मधील प्रत्येकांची बारकाईने चौकशी केली तेव्हा लाडू सिंग (22) याला कुळे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक रिव्हॉल्वर व 3 जिवंत बुलेट(गोळ्या)सापडल्या.

रामनगर व कुळे पोलिसांनी चौघांपैकी तिघांना पकडले असून त्यांनी बेकायदेशीररित्या रिव्हॉल्व्हर का जवळ ठेवले, कशासाठी तीन रिव्हॉल्व्हर घेऊन फिरत होते, चौथ्याजवळ रिव्हॉल्व्हर होते का, याचा तपास करत आहेत.

गोव्यातील गुन्ह्यात सहभाग आहे का?

सध्या गोव्यात घरफोडी,चोऱ्या, लुटमारीची प्रकरणे होत आहेत.हे चौघेही रिव्हॉल्वर घेऊन गोव्यात किती दिवस होते. यांनी कुणाचा खून केला का, की करणार होते? या दृष्टीनेही तपास सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Velsao Gram Sabha: वेळसाव ग्रामसभेचा मोठा निर्णय! मेगा प्रकल्पांच्या बांधकामावर बंदी; 'कचरा, पाणी आणि रस्त्यांची भेडसावतेय समस्या

Data Protection Law: चिंता मिटली! खरेदी करताना नाही द्यावा लागणार मोबाईल नंबर, ग्राहकांच्या गोपनीयतेसाठी सरकार आणतयं नवा कायदा

Kabul Bus Accident: काबूलमध्ये भीषण अपघात, प्रवासी बस उलटून 25 जणांचा मृत्यू; 27 जखमी

Love Horoscope: जोडीदाराला थोडा वेळ द्या! अनुभवा 'मोठे' बदल; वाचा प्रेम राशीफळ

Michael Clarke Cancer: विश्वचषक जिंकवून देणाऱ्या स्टार क्रिकेटपटूला कर्करोग, पोस्ट करत दिली माहिती

SCROLL FOR NEXT