Goa Crime News Police raid a fake call center in Nerul and arrested three people  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: नेरुळ येथे बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्यांचा पर्दाफाश; पोलिसांकडून तिघांना अटक

Goa Crime News: नेरूळ येथे एका बनावट कॉल सेंटरचा पर्वरी पोलिसांनी सोमवारी रात्री अचानक छापा टाकून पर्दाफाश केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime News: नेरूळ येथे एका बनावट कॉल सेंटरचा पर्वरी पोलिसांनी सोमवारी रात्री अचानक छापा टाकून पर्दाफाश केला. हे बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्या पार्थ पटेल(३१ ,रा.मूळ गुजरात, अर्जुन(२६, रा.गुजरात  ) आणि सुबोध शर्मा (४३, रा.मुंबई ) या तिघा बिगर गोमंतकीयांना पर्वरी पोलिसांनी अटक केली.

आजकालच्या जीवनात आर्थिक फसवणुकीच्या अनेक घटना घडत आहेत. आकर्षक ऑफर्स, स्कीम, बक्षिसे देऊन भोळ्या लोकांना फसवणारे आणि ऑनलाईन आर्थिक व्यवहार करून लोकांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटर्सचा ट्रेंड वाढला आहे.

मंगळवारी उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षद कौशल यांनी पत्रकार परिषद घेऊन या अचानक छाप्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. स्थानिक गुप्तचरांनी दिलेल्या माहितीवरून पर्वरी पोलिसांनी नेरूळमधील बनावट कॉल सेंटरवर अचानक छापा टाकल्याचे कौशल यांनी उघड केले.संशयित हे अमेरिकेतील (America) लोकांशी व अन्य विदेशींशी संपर्क साधायचे. ते स्वतःला मायक्रोसॉफ्टचे कर्मचारी असल्याची बतावणी करून ते तांत्रिक समर्थन (टेक्निकल सपोर्ट) व अँटीव्हायरस देण्याच्या बहाण्याने कॉलर्सशी संपर्क करायचे.

यासाठी ते लॅपटॉप व मोबाईल व इतर उपकरणांचा वापर करायचे. यातून ते पीडित कॉलर्सकडून पैसे उकळायचे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मंदार परब हे करत आहेत. पर्वरी पोलिसांनी (Police) तिघांवर भादंवि कलम ४१९, ४२० व ३३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती कौशल यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT