goa crime news motorcycle pilot crushed under crane Ponda  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: फोंड्यात क्रेनने मोटारसायकल पायलटला चिरडले; चालक अटकेत; गरीब कुटुंबाने गमावला आधारस्‍तंभ

Goa Crime News: फोंडा कदंब बसस्थानकावर आज मंगळवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात हकनाक एका मोटरसायकल पायलटचा बळी गेला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime News: फोंडा कदंब बसस्थानकावर मंगळवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात हकनाक एका मोटरसायकल पायलटचा बळी गेला. त्‍यांचे नाव प्रकाश चोडणकर (५८) असे असून, ते मूळ कवठण-सातार्डा येथील रहिवासी आहेत. दरम्‍यान, क्रेनचालक रणजीतकुमार नागेंद्र प्रसाद (२०, मूळ बिहार) याला पोलिसांनी अटक केली आहे. चोडणकर यांचा मृतदेह संध्‍याकाळी उशिरापर्यंत नातेवाईकांच्‍या ताब्‍यात मिळाला नव्‍हता.

गेल्‍या अनेक वर्षांपासून प्रकाश चोडणकर हे फोंड्यात भाड्याच्या खोलीत राहत होते. पंधरा दिवसापूर्वीच मयताची सासू वारली होती. त्‍यानंतर आजपासूनच ते पुन्‍हा भाडी मारण्याच्‍या आपला व्‍यवसायात उतरले होते. जीए ०५ टी ४१६६ या क्रमांकाची आपली मोटरसायकल घेऊन ते कदंब बसस्थानकावर आले होते. तेथे ग्राहकाच्‍या प्रतीक्षेत मोटरसायकलवर बसून वर्तमानपत्र वाचत असताना क्रेनचालकाच्या (एनएल ०२ क्यू १८८१) चुकीमुळे ते क्रेनखाली सापडले.

क्रेनचालकाने त्यांना पाहिलेच नाही. तेथेच जवळ असलेल्‍या लोकांनी आराडाओरड केल्‍यानंतर चालकाने क्रेन थांबवली. मात्र तोपर्यंत क्रेनखाली चिरडले गेल्‍याने प्रकाश चोडणकर गतप्राण झाले होते. अधिक तपास सुरू आहे.

न्‍याय मिळावा, कुटुंबाची मागणी

घरातील आधारस्‍तंभ अचानक गेल्‍याने चोडणकर कुटुंबावर दु:खाचे आभाळ कोसळले आहे. क्रेनचालकाच्‍या चुकीमुळे हा अपघात घडला असून, चालकासह मालकावरही गुन्‍हा नोंद करावा, अशी मागणी चोडणकर कुटुंबीयांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT